Home /News /maharashtra /

धक्कादायक! मुंबईच्या SRPF जवानाचा सासरवाडीच्या लोकांवर गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू

धक्कादायक! मुंबईच्या SRPF जवानाचा सासरवाडीच्या लोकांवर गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू

Crime in Solapur: सोलापुरातील एका SRPF च्या जवानाने आपल्या सासुरवाडीच्या लोकांवर गोळीबार केला आहे. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

सोलापूर, 21 ऑक्टोबर: सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या बार्शी (Barshi) तालुक्यातील भातंबरे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका SRPF च्या जवानाने आपल्या सासुरवाडीच्या लोकांवर गोळीबार (Gun firing by SRPF soldier) केला आहे. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू (1 dead in gun firing) झाला आहे, तर अन्य एका तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून (suspicion of wife immoral relationship) आरोपी जवानाने हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा पोलिसांनी आरोपी जवानाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत. नितीन बाबुराव भोसकर असे गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो आरोपी जवानाच्या मेहुण्याचा मित्र होता. तर गोरोबा महात्मे असं अटक केलेल्या आरोपी जवानाचं नाव आहे. तो बार्शी तालुक्यातील भातंबरे येथील रहिवासी असून सध्या मुंबईत कार्यरत आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक सरकारी पिस्टल आणि 26 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही गोळीबाराची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. हेही वाचा-आई-वडील शेतात जाताच एकट्या मुलीवर साधला डाव; रेप आणि खुनाच्या घटनेनं नगर हादरलं! नेमकं प्रकरण काय आहे? आरोपी जवान गोरोबा महात्मे याचा हा मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीसोबत वाद सुरू होता. पत्नीचा बाहेर कोणासोबत तरी प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय आरोपी जवानाला होता. यातून त्याचे आपल्या पत्नीसोबत वाद झाले होते. त्यामुळे जवानाची समजूत काढण्यासाठी सासरची मंडळी जवानाच्या घरी आले होते. यावेळी आरोपी जवानाच्या मेहुण्याचा एक मित्र देखील सोबत आला होता. यावेळी सासुरवाडीच्या मंडळीसोबत बोलणी फिसकटल्याने जवानाने रागाच्या भरात जमलेल्या लोकांवर गोळीबार केला. आरोपी SRPF जवानाने चार गोळ्या झाडल्या. हेही वाचा-पुण्यात टोळक्याची दहशत; दिवसाढवळ्या दोन दुकानं फोडली, घटनेचा LIVE VIDEO या दुर्दैवी घटनेत आरोपी जवानाच्या मेहुण्याचा मित्र नितीन बाबुराव भोसकर याला गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण गोळीबारात जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी जवानाला ताब्यात घेतलं आहे.  पोलिसांनी आरोपीकडून एक सरकारी पिस्टल आणि 26 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Murder, Solapur

पुढील बातम्या