Home /News /ahmednagar /

आई-वडील शेतात जाताच अल्पवयीन मुलीवर साधला डाव; बलात्कार आणि खुनाच्या घटनेनं नगर हादरलं!

आई-वडील शेतात जाताच अल्पवयीन मुलीवर साधला डाव; बलात्कार आणि खुनाच्या घटनेनं नगर हादरलं!

अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील जवळे येथील एका अल्पयवीन मुलीवर तिच्याच घरात अत्याचार करून तिचा खून (Minor girl rape and murder in ahmednagar) केल्याची घटना घडली आहे.

अहमदनगर, 21 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. काल ठाण्यात एका तरुणीवर चार जणांनी कारमध्ये अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असताना, नगर जिल्ह्यात अमानुषतेचा कळस गाठणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील जवळे येथील एका अल्पयवीन मुलीवर तिच्याच घरात अत्याचार करून तिचा खून (Minor girl rape and murder in ahmednagar) केल्याची घटना घडली आहे. मृत अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असताना हा संतापजनक प्रकार घडला आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी ही जवळे येथील एका शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. बुधवारी सकाळी पीडित मुलीचे आई- वडील नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेले होते. तसेच तिचा भाऊही शाळेत गेला होता. यावेळी ही मुलगी एकटीच घरी होती. दुपारी एक वाजता तिचा भाऊ शाळेतून परत आला होता. हेही वाचा-पुणे: विवाहित बहिणीसोबत भावाचं विकृत कृत्य; नवरा घरी नसताना भेटायला आला अन्... यावेळी त्यानं आपल्या बहिणीला आवाज दिला, पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्याने घरात पाहिलं असता, ती कॉटवर झोपलेली आढळली. त्याने अनेकदा हाका मारूनही ती उठली नाही. त्यामुळे त्याने जवळ जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला. तरीही तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर घडलेला सर्व प्रकार भावाच्या लक्षात आला. हा प्रकार पाहून भयभीत झालेल्या भावाने मोठमोठ्याने हंबरडा फोडला. हेही वाचा-नराधमाने GF ला केलं मित्रांच्या स्वाधीन; ठाण्यात चौघांकडून तरुणीवर कारमध्ये रेप त्याच्या आवाजाने शेजारी राहणारे लोक घटनास्थळी दाखल झाले. शेजाऱ्यांनी पीडित मुलीला तत्काळ उपचारासाठी जवळे येथील रुग्णालयात दाखल केलं. पण तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Ahmednagar, Rape on minor

पुढील बातम्या