नितीन नांदुरकर, जळगाव 04 नोव्हेंबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट आपल्या संपर्कात असल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रियेनंतरही सुषमा अंधारे आपल्या दाव्यावर ठाम आहेत. संजय शिरसाट यांची कुचंबणा होत असून ते कधीही परत फिरू शकतात, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. सिनियर कोण? जयंत पाटील-अजित पवारांमधली सुप्त स्पर्धा पुन्हा समोर! सुषमा अंधारे म्हणाल्या, की गुवाहाटीला जाताना पहिल्यांदाच गटाची बाजू मांडणारे सर्वात पहिले आमदार संजय शिरसाठ होते. मात्र संभाजीनगरमध्ये आता ज्या पद्धतीने अतुल सावे, संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना फुल फ्लेक्स अधिकार दिले जात आहेत, यावरून संजय शिरसाठ यांची कुंचबना होत आहे. संजय शिरसाट हे आपल्या संपर्कात असलेल्या दाव्याबाबतचे गांभीर्य दीपक केसरकरांना कळत नसून संजय शिरसाट यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे शिरसाट कधीही परत फिरू शकतात, असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला आहे. याआधीही सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट नाराज असल्याचा दावा केला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, की ‘या बंडखोर आमदारांपैकी आत्ताच्या घडीला जर पहिला कुणी परत येईल, तर ते म्हणजे संजय शिरसाट. कारण ते प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यांच्या मंत्रिपदाची आशा मावळली असून सगळ्यात जास्त पश्चाताप संजय शिरसाट यांना होत आहे. ते आमच्या संपर्कात सुद्धा आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या. Ajit Pawar : पुण्यात अजित पवारांच्या सभेआधी गोंधळ, बॅनर लावण्यावरून मोठा वाद सुषमा अंधारे यांच्या या दाव्यावर संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिली होती. शिरसाट म्हणाले होते, की सुषमा अंधारे यांना मी ओळखतो. त्या माझी बहीण आहेत आणि हे सगळं काळजीपोटी बोलल्या. मात्र, आमचं हे बंड नाही, उठाव आहे. या अशा बातम्यांमुळे मला त्रास होतो. मी नाराज नाही. योग्य वेळी योग्य निर्णय होईल, असं म्हणत मी शिंदे साहेबांच्या सोबत असल्याचं शिरसाट म्हणाले होते. मात्र, शिरसाट यांच्या या प्रतिक्रियेनंतरही सुषमा अंधारे यांनी आता पुन्हा एकदा हा दावा केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.