पुणे, 3 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्याच्या शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला आहे. सभा होत असलेल्या ठिकाणी बॅनर लावण्यावरून वाद झाला आहे. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराची सभा सुरू होण्याअगोदर सत्ताधारी आणि विरोधी गटात तणाव निर्माण झाला आहे. पाच हजार मयत सभासदांच्या वारसांना सभासद का करून घेतले नाही? याचा जाब विचारणारा फ्लेक्स विरोधकांनी सभास्थळी लावला, यावरून वाद निर्माण झाल्यामुळे घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. शरद पवारांना आजही डिस्चार्ज नाही; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट शिरुर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांची गेली 25 वर्ष या कारखान्यावर सत्ता आहे, पण यावेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राहिलेले दादा पाटील फराटे यांनी पॅनल टाकून कडवं आव्हान उभं केलं आहे. यामुळे आमदार अशोक पवार यांनी अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांची सभा लावून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला आहे. या कारखान्यावर 450 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचा दावा विरोधक करत आहेत, पण विरोधकांचा हा खोटा अपप्रचार असल्याचा प्रत्यारोप आमदार अशोक पवार यांनी केला आहे. दरम्यान अजित पवार यांनी या बॅनरबाजीवर प्रतिक्रिया दिली आहे. कारखान्याच्या मयत मतदार यादीबद्दल ऐकलं, पण प्रत्येक कारखान्यात हे असंच असतं, त्यामुळे विरोधकांचा आरोप खोटा आहे, असं अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.