मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sushama Andhare Husband : सुषमा अंधारे आणि मी याच कारणासाठी वेगळं झालो, वैजनाथ वाघमारे सविस्तरच बोलले

Sushama Andhare Husband : सुषमा अंधारे आणि मी याच कारणासाठी वेगळं झालो, वैजनाथ वाघमारे सविस्तरच बोलले

सुषमा अंधारे यांच्या पूर्वीच्या पतीने त्यांच्यावर घाणाघाती आरोप केल्याने शिंदे गट आणि ठाकरे गटात आता नवा वाद सुरू झाला आहे.

सुषमा अंधारे यांच्या पूर्वीच्या पतीने त्यांच्यावर घाणाघाती आरोप केल्याने शिंदे गट आणि ठाकरे गटात आता नवा वाद सुरू झाला आहे.

सुषमा अंधारे यांच्या पूर्वीच्या पतीने त्यांच्यावर घाणाघाती आरोप केल्याने शिंदे गट आणि ठाकरे गटात आता नवा वाद सुरू झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 नोव्हेंबर : ठाकरे गटातील फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी मागच्या काही महिन्यांपासून शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका केली. या टीकेचा वचपा काढण्याची तयारी आता शिंदे गटाकडून केली जात आहे. सुषमा अंधारे यांचे पूर्वीचे पतीच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सुषमा अंधारे यांच्या पूर्वीच्या पतीने त्यांच्यावर घाणाघाती आरोप केल्याने शिंदे गट आणि ठाकरे गटात आता नवा वाद सुरू झाला आहे. सुषमा अंधारेंना मी घडवलं आहे असे म्हणत वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर घाणाघाती आरोप केले.

अंधारे यांचे वेगळे राहिलेले पती वकील वैजनाथ वाघमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. या पार्श्वभूमीवर त्यांनी सुषमा अंधारे आणि ते पती-पत्नीच्या नात्यातून वेगळे का झाले याबाबत एबीपी माझाशी बोलताना मुख्यकारण सांगितलं. सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्या नात्याला खरा कटुता आला. यावेळेपासून आम्हील वेगळे झालो, सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नये असे मला वाटत होते. त्या भाडोत्री वाहन म्हणून राष्ट्रवादीत गेल्या. त्यानंतर आमच्या नात्याला खरा तडा गेला. त्यांचे विचार वेगळे राहिले आणि माझे विचार वेगळे राहिले. असे वाघमारे म्हणाले.

हे ही वाचा : 'त्यांनी मला घडवलं हे...'; विभक्त पतीच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

तो त्यांचा निर्णय मला मान्य नव्हता

सुषमा अंधारे यांचे भाषण कौशल्य चांगल असल्याने त्यांना मला नेताच करायचं होते. सुषमा अंधारे आंबेडकरी चळवळीच्या मुलुख मैदानी तोफ होत्या. यामुळे त्यांच्या विचारांना मोठे करण्यासाठी अंधारेंना झोपडपट्टीत पाठवायचं नव्हतं किंवा ऊसतोड कामगार, विटभट्टी कामगार म्हणून पाठवायचे नव्हतं. पण ‘चकली देणं आणि हलकी डोलकीचा तमाशा उभा करणं’ योग्य वाटलं नाही. तो त्यांचा निर्णय होता आणि तो मला मान्य नव्हता. त्यामुळे तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये कोणताही संबंध नाही, अशी माहिती वैजनाथ वाघमारे यांनी दिली.

ते म्हणाले, चार दिवस सुषमा अंधारेंनी एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने त्रास दिला. त्याच गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे काय चीज आहे, कोठून आल्या, काय झालं, कोणी आणलं हे सगळं सविस्तरपणे मांडत त्यांचा भांडाफोड करणार असल्याचे ते म्हणाले. 

हे ही वाचा : खरंच प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कनेक्शन!

एकमेकांविरोधात निवडणूक लढण्याची वेळ आली तर लढणार का? या प्रश्नावर वाघमारे म्हणाले, तशी वेळ आली तर अगदी निवडणूक लढेन. माझे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे माझा नेता, माझा पक्ष जो निर्णय देतील, जे काम करायला सांगतील ते करेन. एकनाथ शिंदेंची भूमिका चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करण्याची आहे. ते सांगतील तसं मी काम करेन. माझ्यासमोर सुषमा अंधारे असू दे किंवा इतर कोणीही, मी निवडणूक लढेन.

First published:
top videos

    Tags: Cm eknath shinde, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)