पुणे 13 नोव्हेंबर : ठाकरे गटातील प्रवक्त्या सुषमा अंधारे अनेकदा शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करताना दिसतात. मात्र, आता सुषमा अंधारे यांचे पूर्वीचे पतीच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सुषमा अंधारे यांना मी घडवलं, असा दावाही वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटातील प्रवेशाआधी केला होता. आता या संपूर्ण प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, की ‘माझे पती आणि मी गेली 5- सहा वर्षे विभक्त आहोत. शिंदे गटातील प्रवेश हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. माध्यमांनी ही बातमी फार महत्वाची मानू नये.’ लवकरच पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे काय आहे याचा खुलासा करणार आहे, असं वैजनाथ वाघमारे म्हणाले होते. यावरही सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, की ‘त्यांच्याकडे काय गुपित आहे माहिती नाही. पण मी तयार आहे.’ मोठी बातमी! ठाकरे गटाची मुलुखमैदान तोफ सुषमा अंधारेंचे पती करणार शिंदे गटात प्रवेश सुषमा अंधारे यांची LLB ची डिग्री त्यांनी दाखवावी, असंही वैजनाथ म्हणाले होते. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, की ‘मी कधीच म्हटले नाही की माझ्याकडे llb ची डिग्री आहे. ते म्हणतात की त्यांनी मला घडवलं त्यावर मला काहीच बोलायचे नाही. त्यांना तो आनंद घेऊ द्या. मी माझ्या मुलीचे नाव पण कबिरा सुषमा अंधारे असं लावते, यातच सर्व काही आलं. पब्लिक लाईफमधे त्यांचा आणि माझा एकत्र फोटो दाखवावा’ हे सगळं ठरवून केलेलं राजकारण आहे. जो तो आपआपल्या कर्तुत्वाने मोठा होतोय. कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या, असंही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या. वैजनाथ वाघमारे यांनीही सकाळी पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं, की वैजनाथ ‘आम्ही दोघं अनेक वर्षांपासून विभक्त राहातो. आमचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका पटली म्हणून मी त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहे. एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली आहे. त्यांच्यासमोर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी हो म्हटलं आणि आज प्रवेश करत आहे, असी माहिती वाघमारे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.