मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sushma Andhare : पतीच्या आरोपानंतर सुषमा अंधारेंची लेक प्रिय कब्बुसाठी भावनिक पत्र म्हणाल्या…

Sushma Andhare : पतीच्या आरोपानंतर सुषमा अंधारेंची लेक प्रिय कब्बुसाठी भावनिक पत्र म्हणाल्या…

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे मागच्या काही दिवसांपासून आपल्या भाषणाच्या शैलीमुळे चांगल्याच फेमस झाल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे मागच्या काही दिवसांपासून आपल्या भाषणाच्या शैलीमुळे चांगल्याच फेमस झाल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे मागच्या काही दिवसांपासून आपल्या भाषणाच्या शैलीमुळे चांगल्याच फेमस झाल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 नोव्हेंबर : शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे मागच्या काही दिवसांपासून आपल्या भाषणाच्या शैलीमुळे चांगल्याच फेमस झाल्या आहेत. दरम्यान अचानक आज शिंदे गटाने त्यांच्यावर धक्कादायक राजकीय गेम खेळल्याने दिवसभर सुषमा अंधारे चर्चेत होत्या. सुषमा अंधारे यांचे पूर्वीचे पती वैजनाथ वाघमारे यांना शिंदे गटाने प्रवेश दिल्याने ठाकरे गट आणि शिंदे गटात आता नव्याने शाब्दिक युद्धाला सुरूवात होणार आहे. दरम्यान सुषमा अंधारे यांनी अचानक सोशल मीडियावर मुलीचा जुना फोटो टाकत आठवणींना उजाळा दिल्याने त्यांच्या भावनीक पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे…

प्रिय कब्बु,

तू फक्त 45 दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे.  मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं..  बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता.

हे ही वाचा : कोकणात लवकरच राजकीय भूकंप? ठाकरेंच्या शिलेदाराची उदय सामंतांसोबत गुप्त बैठक!

पण अख्ख कुटुंब  पाठीशी उभा राहिलं.. विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला. दुबईत दोन तास बोलुन मी आल्या पावली घारी सारखी तुझ्याकडे झेपावले.

बाळा,  तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तूझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..!

तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात,.

बाबासाहेब लिहितात, " जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत. त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील.  तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील.

हे ही वाचा : सुषमा अंधारे आणि मी याच कारणासाठी वेगळं झालो, वैजनाथ वाघमारे सविस्तरच बोलले

पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील..! 

भय , भ्रम , चरित्र हत्या हि मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा " _ डॉ बाबासाहेब आंबेडकर

First published:
top videos

    Tags: Cm eknath shinde, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)