जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत का? सुप्रिया सुळे म्हणाल्या हात जोडून...

पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत का? सुप्रिया सुळे म्हणाल्या हात जोडून...

पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत का? सुप्रिया सुळे म्हणाल्या हात जोडून...

आज अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. या भेटीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19  जानेवारी : आज अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी प्रसारमाध्यमांना टोला लगावला आहे. ‘खूप प्रांजळपणाने हात जोडून सांगते, आमच्या घराबद्दल बोलल्याशिवाय बातमी होत नाही, आमचा फोटो लावल्याशिवाय टीव्ही पण बीझी राहात नाही’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. भाजपला टोला   दरम्यान यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपला देखील टोला लगावला आहे. भाजपकडे मोठ्या नेत्यांची फळी होती. मला कधी-कधी मोदीजींची काळजी वाटते  देशात कुठलीही निवडणूक लागली, अगदी ग्रामपंचायतीची तरीही मोदीजींनाच यावं लागत. मोदी एकमुखी नेतृत्व आहे, असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावला आहे. तसेच महाराष्ट्राच्या मंत्रालयात गेल तरीही मंत्री भेटत नाही.  कुणाकडे कुठल मंत्रालय आहे हे पण कळत नाही. एकही महिला मंत्री नाही अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. हेही वाचा :   राष्ट्रवादीचा बडा नेता ठाकरे गटाच्या गळाला; रामदास कदमांच्या अडचणीत वाढ? ‘पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ’   आज पार्थ पवार यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. त्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांना राष्ट्रवादीत अस्वस्थ वाटत आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.  त्यामुळे ते राजकीय स्थिरता शोधत आहेत, यातूनच त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात