जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राष्ट्रवादीचा बडा नेता ठाकरे गटाच्या गळाला; रामदास कदमांच्या अडचणीत वाढ?

राष्ट्रवादीचा बडा नेता ठाकरे गटाच्या गळाला; रामदास कदमांच्या अडचणीत वाढ?

राष्ट्रवादीचा बडा नेता ठाकरे गटाच्या गळाला; रामदास कदमांच्या अडचणीत वाढ?

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकीय वर्तृळात मोठ्या उलथापालथीची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या नव्या रणनितीमुळे रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

रत्नागिरी, 19 जानेवारी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकीय वर्तृळात मोठ्या उलथापालथीची शक्यता आहे. माजी आमदार संजय कदम हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत  आहे. संजय कदम यांची घरवापसी झाल्यास शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत. दापोली-विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री रामदास कदम यांना धक्का देण्याची रणनीती सध्या ठाकरे गटाकडून आखण्यात येत आहे, याच पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.  पुढील 15 दिवसांमध्ये संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असून, यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.    उद्धव ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल  मिळत असलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय कदम यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे आता लवकरच संजय कदम यांची घरवापसी होणार असून, ते राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 15 दिवसांमध्ये संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चार पैकी दोन आमदार हे शिंदे गटात दाखल झाल्यानं जिल्ह्यात ठाकरे गट पिछाडीवर गेला आहे. मात्र संजय कदम यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यास पुन्हा एकदा या मतदारसंघात चुरस निर्माण होणार आहे. हेही वाचा :  पार्थ पवारांनी घेतली शंभूराज देसाईंची भेट; चर्चेला उधाण, पडळकरांचा भेटीबाबत मोठा गौप्यस्फोट रामदास कदमांच्या अडचणीत वाढ   संजय कदम हे  लवकरच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संजय कदम यांची घरवापसी झाल्यास शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत. दापोली-विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री रामदास कदम यांना धक्का देण्याची रणनीती सध्या ठाकरे गटाकडून आखण्यात येत आहे. संजय कदम यांच्या रुपाने दापोली विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. संजय कदम हे रामदास कदम यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात, त्यामुळे कदम यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात