मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Supriya Sule : अजित पवार खरचं नाराज? नॉटरिचेबल चर्चेवर सुप्रिया सुळेंचा खुलासा

Supriya Sule : अजित पवार खरचं नाराज? नॉटरिचेबल चर्चेवर सुप्रिया सुळेंचा खुलासा

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिवीगाळ केली तरी अजित पवारांनी साधं ट्वीट देखील न केल्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिवीगाळ केली तरी अजित पवारांनी साधं ट्वीट देखील न केल्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिवीगाळ केली तरी अजित पवारांनी साधं ट्वीट देखील न केल्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 09 नोव्हेंबर : मागच्या दोन दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली. या प्रतिक्रीयेचा राज्यातील सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला. दरम्यान या सगळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते सुप्रिया सुळे यांचे बंधू अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिवीगाळ केली तरी अजित पवारांनी साधं ट्वीट देखील न केल्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला बघायला मिळतोय. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतल्या शिबिरापासून अजित पवार नॉट रिचेबल आहेत.

काही तासांपूर्वी राजकीय पटलावर विरोधी पक्षनेते अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेला ओत आला होता. यावर स्पष्टीकरण देताना प्रत्येकाला त्याचे एक पर्सनल आयुष्य असते, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या चर्चेवर पडदा टाकला. याविषयी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अजित पवार त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते नॉट रिचेबल असू शकतात. म्हणून याचा अर्थ काही राजकीय असेल असे होऊ शकत नाही. असे मत सुळे यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा : BREAKING: ED ला न्यायालयाचा धक्का, संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

संजय राऊत यांच्या सुटकेवर ही सुळेंचे विधान

गेल्या १०० दिवसांपासून संजय राऊत हे ईडीच्या कोठडित आहेत. आज त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. कथित प्रत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने अटक केली होती. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर माध्यमांशी बोलताना सत्यमेव जयते अशी पहिली प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अनिल देशमुख, नवाब मल्लिक आणि संजय राऊत वेगवेगळ्या प्रकरणात अटकेत आहेत. संजय राऊतांना आज न्यायालयाने जामीन  ईडीच्या कोठडीत असणाऱ्यांनी लवकरात लवकर बाहेर यावे. पुन्हा लोकांच्यात जाऊन मायबाप जनतेची सेवा करावी, अशी अपेक्षादेखील सुळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली. हे आमचे आणि देशाचे लढवय्ये नेते आहेत.

हे ही वाचा : संजय शिरसाट शिवसेनेत परतणार, का आहे शिंदे गटात नाराज? अंधारेंनी स्पष्टच सांगितलं

प्रत्येकाच्या वाट्याला असा वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष येत असतो, त्याला प्रत्येकाने सामोरे जावे लागते. हे आमचे लढवय्ये नेते आहेत, म्हणून ते लढत आहेत. संजय राऊत हे लवकरच निर्दोश बाहेर येतील आणि पुन्हा नव्याने कामाला लागतील असेही त्या म्हणाल्या.

First published:

Tags: Ajit pawar, NCP, Supriya sule