मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ईडी सरकारमुळेच 40 गावांचा कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय, सुप्रीया सुळेंचा गंभीर आरोप

ईडी सरकारमुळेच 40 गावांचा कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय, सुप्रीया सुळेंचा गंभीर आरोप

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रात असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांवर दावा केला आहे. यावर सुप्रीय सुळेंनी टीका केली आहे.

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रात असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांवर दावा केला आहे. यावर सुप्रीय सुळेंनी टीका केली आहे.

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रात असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांवर दावा केला आहे. यावर सुप्रीय सुळेंनी टीका केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 23 नोव्हेंबर : कर्नाटक सरकारने महाराष्ट्रात असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांवर दावा केला आहे. जतमधील 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्रानं गांभीर्यानं विचार करावा असंही बोम्मई म्हणाले. दरम्यान यावर आता राज्यातील राजकारणात चांगलाच धुमाकूळ माजला आहे. विरोधकांनी यावर रान उठवण्यास सुरू केले आहे. शिवसेनेचे खासदार  संजय राऊत, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे.

सुप्रीया सुळे पुढे म्हणाल्या की, ईडी सरकार हे इंग्रजांचे सरकार वाटत आहे. जनरल डायरने जसा अन्याय केला तसा अन्याय हे सरकार करत आहे. तसे जनरल डायर या राज्यात आले आहेत. त्यांनी ठरवले आहे महाराष्ट्रचे तुकडे करायचे. त्याच दिशेने यांची वाटचाल सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील 40 गावे कर्नाटकात विलीन होणार या प्रकरणावर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हे ही वाचा : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला सांगलीतील गावांवर दावा, फडणवीस म्हणाले हा ठराव तर...

निवडणुका लांबणीवर पडण्यामागे हे सरकार कारणभूत

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या कोणत्या कारणाने पुढे ढकलल्या जात आहेत. यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातोय. प्रतिनिधी किंवा नगरसेवक असेल हा सगळ्यांच्या रोजच्या सुखदुखात असतो हे इलेक्शन तातडीने घेतलंच पाहिजे असं आमचं आधी मत होतं माझा आजही मत आहे. कारण आज सर्वसामान्य जनतेला प्रचंड अडचण होत आहे.

आपले 15 व्या वित्त आयोगातले अनेक कोटी रुपये हे परतल्याने महाराष्ट्राला फटका बसला आहे. या ईडी सरकारच्या कारभारामुळे त्यांना माहिती होते त्यांना यश मिळणार नाही त्यामुळे ते निवडणुका लांबणीवर नेत आहेत. ते पळवाटा शोधत आहेत.

दिशा सॅलियान प्रकरणावर सुळे म्हणतात

आपल्या राज्यात कोणत्याही प्रकरणात राजकारण घुसवून गलिच्छ राजकारण सुरू केलं जात आहे. एखादं कुटुंब उध्वस्त करण्याचे पाप हे सरकार करत आहे. ही महाराष्ट्रची संस्कृती नाही.  यापूर्वी महाराष्ट्रात असल्या पद्धतीने राजकारण झालेल आम्ही कधीही पाहिले नाही.

हे ही वाचा : 'शिंदे सरकार माझ्या जीवाशी खेळतंय, जर काही...' संजय राऊतांचा थेट इशारा

नवले ब्रिज प्रकरणावर

पुण्यात मागच्या काही दिवसांता नवले ब्रिजवर अपघात होत आहेत ही अपघातांची मालिका थांबली पाहिजे. गडकरी साहेबांनी जवळपास 18 ते 20 गोष्टी सुचवल्या त्याने ते बदल घडून आले होते. सहा महिन्यांमध्ये पहिल्यापेक्षा अपघात कमी झाले होते. गेल्या दोन चार दिवसात पुन्हा अपघात झाले. मी गडकरी साहेबांना ट्विटरच्या माध्यमातून त्यांचे ऑफिसलाही कॉन्टॅक्ट केलेला आहे. कलेक्टर प्रशासनाच्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आहे आणि तो शून्य आणि 100% सेफ्टीझोन हा झाला पाहिजे असा आमचा आग्रह असल्याचे त्या म्हणाल्या.

First published:

Tags: Cm eknath shinde, Devendra Fadnavis, Sangli (City/Town/Village), Supriya sule