मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'शिंदे सरकार माझ्या जीवाशी खेळतंय, जर काही...' संजय राऊतांचा थेट इशारा

'शिंदे सरकार माझ्या जीवाशी खेळतंय, जर काही...' संजय राऊतांचा थेट इशारा

मी त्यांच्याकडे सुरक्षा मागणार नाही. पण, त्यांच्याकडे कोणती अशी समिती आहे, ज्यांनी विरोधकांची सुरक्षा काढली

मी त्यांच्याकडे सुरक्षा मागणार नाही. पण, त्यांच्याकडे कोणती अशी समिती आहे, ज्यांनी विरोधकांची सुरक्षा काढली

मी त्यांच्याकडे सुरक्षा मागणार नाही. पण, त्यांच्याकडे कोणती अशी समिती आहे, ज्यांनी विरोधकांची सुरक्षा काढली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 23 नोव्हेंबर : ' शिंदे सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे. मी त्यांच्याकडे सुरक्षा मागणार नाही. पण, त्यांच्याकडे कोणती अशी समिती आहे, ज्याने विरोधकांची सुरक्षा काढली आहे. आमच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार राहिल, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला इशारा दिला.

शिंदे सरकारने विरोधकांना दिलेल्या सुरक्षेत कपात केली आहे. संजय राऊत यांचीही सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत कमालीचे संतापले आहे.

'मुंबईतील दंगलीपासून आमची सुरक्षा होती. पण आता सरकारने आमची सुरक्षा काढून घेतली आहे. आम्ही आता या सरकार सुरक्षा मागणार नाही, त्यांच्याकडे जाणारही नाही. हे सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे. मी त्यांच्याकडे सुरक्षा मागणार नाही. पण, त्यांच्याकडे कोणती अशी समिती आहे, ज्यांनी विरोधकांची सुरक्षा काढली. आमच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.

'हे सुडबुद्धीने केलं आहे. आम्ही काम करू नये, आमच्यावर हल्ले व्हावे म्हणून हे केलं आहे. पण आम्ही काम करत राहणार आहोत, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

(धनुष्यबाण ठाकरे गटाला मिळणार? निवडणूक आयोगाच्या कोर्टात सेनेचं पारडं जड!)

'दिशा सालियन प्रकरणामध्ये पोलिसांकडून माहिती मिळाली होती. ज्यांनी ज्यांनी आरोप केले, भाजपचे नेते आणि महिला नेत्यांनी ताबडतोब आदित्य ठाकरे यांची माफी मागितली पाहिजे. तुम्ही आरोप केले आहे ना, तर आताच माफी मागा. एका तरुण नेत्यावर कशाला आरोप करत होता. आता सीबीआय ही केंद्राची तपास यंत्रणा आहे, त्यांनी अहवाल दिला आहे, आदित्य ठाकरेंची ताबडतोब माफी मागा, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

(दिशा सालियन प्रकरणी CBIची आदित्य ठाकरेंना क्लिन चीट,राणेंच्या आरोपातून काढली हवा)

'राज्यात अत्यंक कमजोर आणि हतबल सरकार बसलेले आहे. त्यांना महाराष्ट्र माहिती नाही, त्यांना महाराष्ट्र समजला नाही. त्यांनी या प्रकरणावर कोणत्या मुद्यांना वाचा फोडली. ते या खात्याचे मंत्री आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करू की पंतप्रधानांशी चर्चा करू असं त्यांनी जाहीर केलं. आता कर्नाटकने जतवर दावा केला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. राज्यात सुद्धा भाजपच्या नेतृत्वाखाली मिंधे सरकार आहे. कुणाला मुंबई तोडायची आहे, कुणा राज्याची गावं आणि जिल्हे तोडायचे आहे. याचे काम गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू आहे. हे आपले मुख्यमंत्री त्यांच्या 40 आमदारांना गुवाहाटीला चालले आहे. ते तिथून येईपर्यंत एखाद्या जिल्ह्यावर दावा सांगितला नाही म्हणजे मिळवलं, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

First published: