जाहिरात
मराठी बातम्या / देश / सावधान! लहान मुलांमध्येही वाढतोय कोरोनाचा संसर्ग; नवजात बालकांनाही धोका

सावधान! लहान मुलांमध्येही वाढतोय कोरोनाचा संसर्ग; नवजात बालकांनाही धोका

लहान मुलांना Corona पासून वाचवा

लहान मुलांना Corona पासून वाचवा

नवजात बालकांनाही कोरोनाचा संसर्ग होत असून कोरोनाचा हा नवा स्ट्रेन जास्त संक्रामक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे देशातील विविध भागांमध्ये संक्रमित बालकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 15 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा (SecondWave) लहान मुलांवरही (Children) परिणाम होताना दिसत आहे. नवजात बालकांनाही कोरोनाचा संसर्ग होत असून कोरोनाचा हा नवा स्ट्रेन जास्त संक्रामक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे देशातील विविध भागांमध्ये संक्रमित बालकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गुजरातमधील (Gujrat) अहमदाबाद, सुरत, बडोदा येथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एका वृत्तानुसार, सुरत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका 14 दिवसांच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत डॉक्टरांनी सांगितलं, की कोरोनामुळे अनेक अवयवांचं काम थांबल्याने या बालकाचा मृत्यू झाला आहे. तसंच दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये 14 दिवसांच्या बालकावर उपचार सुरू आहेत. गाझियाबादमध्ये 130 बालकं हॉस्पिटलमध्ये दाखल - राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, कोरोनाची बाधा बालकांनाही झाल्याचं दिसत आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग इतका गंभीर आहे, की त्यांना तातडीने हॉस्पिटल्समध्ये भरती करावं लागत आहे. लोकनायक हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं, की तेथे 8 कोरोनाबाधित बालकं भरती आहेत. यामध्ये 8 महिने ते 12 वर्षे वयोगटातील बालकांचा समावेश आहे. तीव्र ताप, न्युमोनिया, डायरिया आणि तोंडाची चव जाणे अशी लक्षणे या बालकांमध्ये दिसून येत आहेत. (वाचा -  Coronavirus Symptoms: मला कोरोना होऊन तर गेला नाही ना? फक्त 5 लक्षणांवरून ओळखा ) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये 1 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान 130 बालके कोरोनाबाधित झाली आहेत. यात नवजात बालकांपासून 17 वर्षांच्या तरुणांचा समावेश आहे. 0 ते 14 वर्षे वयोगटातील 97 मुलं आहेत, तर 15 ते 17 वर्षे वयोगटातील 33 युवक विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत आहेत.

    (वाचा -  फक्त 156 रुपयांत कोरोनावर उपचार; या योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंतचा खर्च मिळणार )

    हरियाणात (Haryana) 15 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान 41,324 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यात 3445 बालकांचा समावेश आहे. गेल्या 26 दिवसांत 8 टक्के बालकं कोरोनाबाधित झाली आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात