• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • प. बंगाल निवडणूक रणधुमाळीत कोरोनाचा कहर; काँग्रेस उमेदवाराचा रुग्णालयातच मृत्यू

प. बंगाल निवडणूक रणधुमाळीत कोरोनाचा कहर; काँग्रेस उमेदवाराचा रुग्णालयातच मृत्यू

पश्चिम बंगाल (West Bengal ) मध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान कोरोनाचा (Corona) कहर सातत्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 • Share this:
  कोलकत्ता, 15 एप्रिल : पश्चिम बंगाल (West Bengal ) मध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान कोरोनाचा (Corona) कहर सातत्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोविड-19 महासाथीमध्ये कोविड पॉझिटिव्ह झालेल्या काँग्रेसच्या उमेदवाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी कोलकत्त्यातील एका रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. ते मुर्शिदाबादमधील शमशेर गंज विधानसभा भागातून उमेदवार होते. (West bangal Congress candidate dies in hospital due to corona) कोविड-19 पॉझिटिव आल्यानंतर ते कोलकत्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाची सुरू आहे. त्यात गेल्या 24 तासात 6 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हे ही वाचा-COVID-19: एका दिवसात जवळपास दोन लाख जणांना लागण, देशातील कोरोना स्थिती विदारक पश्चिम बंगाल काँग्रेसचे सचिव रोहन मित्रा यांनी ट्वीट करीत याबाबत माहिती दिली. त्यांनी लिहिलं आहे की, कोरोनामुळे शमशेर गंजमधून काँग्रेसचे उमेदवार रेजाउल हक यांचा मृत्यू झाला. आता ही वेळ अधिक सजग राहण्याची आहे. आपण जिवंत राहू आणि पुढील वर्षाचं कॅलेंडर पाहण्यासाठी महासाथीमधून स्वत:चा बचाव करण्यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. पश्चिम बंगालमधील आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एकूण 42,214 नमुन्यांची तपासणी केली त्यापैकी 4,817 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. याचवेळी 2,278 बाधितांनी कोरोनावर मात केली. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 5,84,740 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: