मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Narayan Rane : नारायण राणे म्हणतात कोरोना काळात मोदींनी औषधे आणि इंजेक्शनचे शोध लावल्याने कोरोना कमी झाला

Narayan Rane : नारायण राणे म्हणतात कोरोना काळात मोदींनी औषधे आणि इंजेक्शनचे शोध लावल्याने कोरोना कमी झाला

कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक औषधांचे शोध लावले. यासाठी आपण यापूर्वी इतर देशांवर अवलंबून रहायचो पण मोदींनी ते करुन दाखवले.

कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक औषधांचे शोध लावले. यासाठी आपण यापूर्वी इतर देशांवर अवलंबून रहायचो पण मोदींनी ते करुन दाखवले.

कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक औषधांचे शोध लावले. यासाठी आपण यापूर्वी इतर देशांवर अवलंबून रहायचो पण मोदींनी ते करुन दाखवले.

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 1 सप्टेंबर : कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक औषधांचे शोध लावले. यासाठी आपण यापूर्वी इतर देशांवर अवलंबून रहायचो पण मोदींनी ते करुन दाखवले. (Narayan Rane) त्यामुळे मला त्यांच्या मंत्रिमंडळात असल्याचा अभिमान आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. नारायण राणे यांच्याघरी गणरायाचे आगमन झाले यावेळी त्यांच्याशी प्रसारमाध्यमांनी बातचीत केली यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या प्रगतीसाठी जे काम करत आहेत ते काम उत्कृष्ट असल्याचेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले कि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या काळात संकटात सापडलेल्या अनेक नागरिकांना वाचवण्याचं काम केले आहे. त्यांच्यामुळे अनेक औषधांचे शोध लावले, इंजेक्शनचे शोध लावले, वेगवेगळे डोस देण्यात आले. आपण यापूर्वी इतर देशांवर अवलंबून रहायचो पण मोदींनी ते करुन दाखवले. त्यामुळं मला अभिमान आहे या मंत्रिमंडळात असल्याचा. देशाला योग्य पंतप्रधान मिळालेत अतिशय चांगला कारभार ते करत आहेत. ते भारताला आत्मनिर्भर भारत बनवतील असा मला विश्वास वाटत असल्याचे म्हणाले,

हे ही वाचा : कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्याच्या घरी मुक्काम, 'एक दिवस बळीराजासाठी..' उपक्रमाचा मेळघाटातून श्रीगणेशा

राज्यातील सत्तासंघर्षावर बोलताना ते म्हणाले कि, महाराष्ट्रात यावर्षी गणेशाच्या आगमनापूर्वीच सत्ता बदल झाली. ही गणरायाची कृपा आहे. त्यामुळे राज्यातील अडीच वर्षांपासूनच संकट टळले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे भाजपचे सरकार आले. अडीच वर्षात कायदा सुव्यवस्था नव्हती, विकास नव्हता. कोणत्याही क्षेत्रात उद्धव ठाकरेंच सरकार काम करु शकले नाही. लोकांना न्याय देऊ शकले नाही, असेही राणे पुढे म्हणाले.

याचबरोबर त्यांनी सुशांत सिंह प्रकरणावरी भाष्य केले इथे सुशांत सारख्या कलाकाराची हत्या झाली. दिशा सालियान हिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या झाली. मी वारंवार हा मुद्दा मांडतोय कारण या प्रकरणात अन्याय झाला आहे.

हे ही वाचा : पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? प्रश्न ऐकताच नितीश कुमार उठून चालू लागले, पुढे घडला 'राजकीय ड्रामा'

निरपराध माणसांना मारले गेले आणि यामागे सरकारच्या काही लोकांचा हात आहे. एका तत्कालीन मंत्र्याचा सहभाग आहे. हे पचवलं जातंय हा अन्याय आहे. हा अन्याय दूर केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हत्या आणि बलात्काराची केस संपणार नाही, ती पुन्हा ओपन होईल असा मला विश्वास आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus cases, Modi government, Narayan rane, PM Naredra Modi

पुढील बातम्या