जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्याच्या घरी मुक्काम, 'एक दिवस बळीराजासाठी..' उपक्रमाचा मेळघाटातून श्रीगणेशा

कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्याच्या घरी मुक्काम, 'एक दिवस बळीराजासाठी..' उपक्रमाचा मेळघाटातून श्रीगणेशा

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट दौऱ्यावर आहेत.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट दौऱ्यावर आहेत.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी “ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ” हा उपक्रम राज्यभर राबविण्याची संकल्पना मांडलेली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

औरंगाबाद 01 सप्टेंबर : सुलभ आणि प्रभावी कृषि विषयक धोरणं तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न प्रशासनाने समजून घेणं, त्यावर उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करून शेतकऱ्यांच्या समस्यांच्या मुळापर्यंत जाणार आहेत. यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी “ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ” हा उपक्रम राज्यभर राबविण्याची संकल्पना मांडलेली आहे. ‘राह में ख़तरे भी हैं लेकिन…’, मुख्यमंत्र्यांच्या टोल्यावर धनंजय मुंडेंचा शायरीतून पलटवार! या उपक्रमाचा कालावधी 1 सप्टेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत असणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेताच्या बांधावर आणि ग्रामीण भागात राहणार आहेत. तसंच दैनंदिन शेतीच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन शेतकऱ्यांसोबत त्यांच्या विविध कामांत सहभागी होऊन चर्चा करणार आहेत.

जाहिरात

या उपक्रमाची राज्यस्तरीय सुरुवात 1 सप्टेंबर 2022 रोजी म्हणजेच आजपासून स्वत: कृषिमंत्री महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम अशा मेळघाटातून करत आहेत. धारणी चिखलदरा या अत्यंत दुर्गम , डोंगराळ, कोरडवाहू आणि आदिवासी बहुल तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत ते संपूर्ण दिवसभर असणार आहेत. यासाठी रात्रीचा मुक्काम सत्तार यांनी साद्राबाडी येथील शेतकरी दत्तात्रय चुनीलाल पटेल यांच्या निवासस्थानी केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी,समस्या, त्यातून निर्माण होणारे नैराश्य आणि त्यातून उद्भवणाऱ्या शेतकरी आत्महत्या यासंदर्भात योजना तयार करणारे आणि ती राबविणारे शासनाचे वेगवेगळे विभाग यांना याबाबतची कारणमीमांसा करून आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने हा उपक्रम सुरू केलेला आहे. दहशतवादी कारवायांचा आरोप, आसाम सरकारने मदरश्यावर चालवला बुल्डोझर कृषि आणि संलग्न विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आणि शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का याची समीक्षा कृषिमंत्री करणार आहेत. शेतकऱ्यांना होणारा पतपुरवठा , त्यांची सामाजिक सुरक्षा , आरोग्य , शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार , पिकांमधील वैविधीकरण आणि शेतकऱ्यांची मार्केटला जोडणी याबाबत अतिशय सुक्ष्म पद्धतीने अभ्यास ते करणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात