Home /News /maharashtra /

VIDEO: सापांशी स्टंटबाजी करणं आलं अंगाशी, वनविभागानं तरुणावर केली अशी कारवाई

VIDEO: सापांशी स्टंटबाजी करणं आलं अंगाशी, वनविभागानं तरुणावर केली अशी कारवाई

साप कधीही दूध पीत नाही, तरीही तेथील महिलांनी आणलेल्या वाटीत सापाचे तोंड दाबून त्याला जबरदस्तीनं दूध पाजण्याचा प्रयत्न करत होता.

डोंबिवली, 25 जुलै: लॉकडाऊनच्या काळात सापांशी स्टंटबाजी करणं एका तरुणाच्या अंगाशी आलं आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. निरव गोगरी असं स्टंटबाज तरुणाचं नाव असून तो डोंबिवली पूर्वेत राहणारा आहे. निरव गोगरी याच्यावर वन अधिनियमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. हेही वाचा...मोठी कारवाई! कोरोनाबाधितांकडून अवास्तव बिल वसूल करणाऱ्या रुग्णालयाची मान्यता रद्द नागपंचमीच्या निमित्तानं निरव यानं शनिवारी आसपासच्या परिसरात फिरणाऱ्या सापांना पकडून आणलं. त्यानंतर हा तरुण पकडलेल्या सापाचे तोंड पकडून परिसरातील रहिवाशांच्या गळ्यात घालत होता. तसेच साप कधीही दूध पीत नाही, तरीही तेथील महिलांनी आणलेल्या वाटीत सापाचे तोंड दाबून त्याला जबरदस्तीनं दूध पाजण्याचा प्रयत्न करत होता. एवढंच नाही तर एका व्यक्तीकडून स्टंटबाजीच व्हिडीओ तयार करवून घेतले. तसेच या सापांबरोबर तो स्टंट करायचा. इतकेच नव्हे तर त्याचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियासह युट्युबवरही टाकाले. निरव गोगरी याची स्टंटबाजी निदर्शनास येताच वनविभागाने त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं. आरोपीच्या विरोधात वन अधिनियमाप्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आला. हेही वाचा...तुम्ही महाराष्ट्रभर फिरतात, मुख्यमंत्री एकाच ठिकाणी बसून! काय म्हणाले शरद पवार कल्याणच्या वनक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे म्हणाल्या की, लॉकडाऊनच्या काळात आर्थिक मंदी आल्याने उदरनिर्वाहासाठी सापांशी स्टंट करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या तरुणाने दिली आहे. वन कायद्यानुसार साप वा अन्य पशू-पक्षांचे खेळ करणे, त्यांना हाताळणे गुन्हा असल्यामुळे या तरुणावर कायदेशीर कारवाई केली असल्याची माहिती कल्पना वाघेरे यांनी दिली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Dombivali, Kalyan, Snake, Stunt, Stunt video

पुढील बातम्या