मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचे तयार केले अश्लील फोटो, अपलोड केले पॉर्नसाइटवर, नगरमधील धक्कादायक घटना

विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचे तयार केले अश्लील फोटो, अपलोड केले पॉर्नसाइटवर, नगरमधील धक्कादायक घटना

शाळेतील एका शिक्षिकेचा मोबाइल क्रमांक हा पॉर्न साईटवर अपलोड करण्यात आला होता. तर एका विद्यार्थ्याचा फोटो आणि...

शाळेतील एका शिक्षिकेचा मोबाइल क्रमांक हा पॉर्न साईटवर अपलोड करण्यात आला होता. तर एका विद्यार्थ्याचा फोटो आणि...

शाळेतील एका शिक्षिकेचा मोबाइल क्रमांक हा पॉर्न साईटवर अपलोड करण्यात आला होता. तर एका विद्यार्थ्याचा फोटो आणि...

अहमदनगर, 01 ऑक्टोबर : कोरोनाकाळात (corona) विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन (smartphone) हा संपर्क आणि शिक्षणासाठी प्रभावी माध्यम ठरत असला, तरी याचे अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांनी याच फोनच्या सहाय्याने शिक्षिकांचे अश्लील फोटो (pornographic photos) तयार करून ते व्हायरल करण्यासह त्यांचा मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर (porn sites) टाकणे, असे धक्कादायक गुन्हे केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत.

अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यातील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. काही टवाळखोर विद्यार्थ्यांनी शिक्षिकेच्या फोटोंचे मॉफिंग करून, त्याचे अश्लील फोटोंमध्ये रूपांतर करून ते इन्स्टाग्राम सारख्या सोशल साइटवर अपलोड करण्यात आले आहेत. ही पोरं एवढ्यावरच थांबली नाहीतर त्यांनी त्या शिक्षिकेला वारंवार व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य करत होते.

विमानतळावर पुन्हा घुसलं माकड, फूड प्लाझामध्ये घातला धुमाकूळ; पाहा VIDEO

आणखी एका शाळेत असाच प्रकार घडला.  शाळेतील एका शिक्षिकेचा मोबाइल क्रमांक हा पॉर्न साईटवर अपलोड करण्यात आला होता. तर एका विद्यार्थ्याचा फोटो आणि मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आला, तर चौथ्या प्रकरणात एका शालेय मुलीचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून अश्लील चॅट व्हायरल करण्यात आले होते. पीडित व्यक्तींनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्यानंतर, तपासात हे गुन्हे करणारे ओळखीचेच अल्पवयीन विद्यार्थी असल्याचं समोर आलं.

‘महिलांबाबत शब्द जपून वापरा’; कबीर सिंगच्या VIDEO वरून मुंबई पोलिसांचा दम

'कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मुलांच्या हातात दिवसभर मोबाईल आहे. त्यामुळे शिक्षणाबरोबरच मुलांचा सोशल मीडियाकडे कल वाढला आहे. असं असलं तरी तरी पालकांनी आपला पाल्य शिक्षण घेता घेता इंटरनेटचा वापर आणखीन कुठल्या गोष्टीसाठी करतोय, त्यात तो काय करतो आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. पालकांनी लक्ष ठेवल्याने मुलाना आपण चुकीचे काही करत नाही ना असा धाक बसेल', असं आवाहन पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांनी केलं आहे.

First published:

Tags: Students