मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

‘महिलांबाबत शब्द जपून वापरा’; कबीर सिंगचा VIDEO दाखवत मुंबई पोलिसांनी दिला कडक इशारा

‘महिलांबाबत शब्द जपून वापरा’; कबीर सिंगचा VIDEO दाखवत मुंबई पोलिसांनी दिला कडक इशारा

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सोशल मीडियावर मीम्सच्या (Social media memes) माध्यमातून महिला सन्मानाबद्दल (misogyny) काय सांगितलं आहे पाहा..

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सोशल मीडियावर मीम्सच्या (Social media memes) माध्यमातून महिला सन्मानाबद्दल (misogyny) काय सांगितलं आहे पाहा..

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सोशल मीडियावर मीम्सच्या (Social media memes) माध्यमातून महिला सन्मानाबद्दल (misogyny) काय सांगितलं आहे पाहा..

मुंबई, 1 ऑक्टोबर: शब्दांची (Word power) ताकद एखाद्या शस्त्रापेक्षाही अधिक असते. प्रत्येक शब्द विचारपूर्वक वापरा! हे सांगायला मुंबई पोलिसांनी एक अभिनव प्रयोग केला आहे. शब्द शस्त्राप्रमाणे प्रत्यक्ष कसल्याही जखमा न करताही शब्दांचं धारदार हत्यार हवा तो परिणाम साधू शकते. समाजमनावर परिणाम करणाऱ्या चित्रपटासारख्या माध्यमातून शब्दांची ताकद दिसून येते. आजही अनेक जुन्या चित्रपटांमधले संवाद लोकांना तोंडपाठ आहेत. काळानुसार चित्रपटातली भाषाही बदलली आहे. याच बदलत्या भाषेचा, संवादाचा समाजावर पडणारा प्रभाव लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून भाषेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभावी संदेश देणाऱ्या सर्जनशील आणि कल्पक मीम्ससाठी (Mumbai Police Memes) मुंबई पोलिसदलाची ख्याती आहे. मुंबई पोलिसांनी हिंदी चित्रपटांतल्या (Bollywood) महिलांसंदर्भातल्या काही संवादांचं उदाहरण देऊन त्यातली भाषा महिलांचा अपमान करणारी असल्याचं म्हटलं असून, असे शब्द वापरताना काळजी घ्या, असा इशारा दिला आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मुंबई पोलिसांच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर कबीर सिंह, हम तुम्हारे हैं सनम, दिल धडकने दो, दबंग आणि मालामाल या चित्रपटांतले अनेक संवाद शेअर केले आहेत. या चित्रपटांमधले महिलाविरोधी संवाद आणि दृश्याचे फोटो शेअर करण्यात आले असून, 'महिलांच्या विरोधातल्या अशा गोष्टींकडे मनोरंजनाच्या किंवा मजेच्या दृष्टीनं बघणं बंद करा. अशा संवादाचा, भाषेचा वापर करू नका अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल,' असा सज्जड इशारा दिला आहे.

इन्स्टाग्राम अकाउंटवरच्या संदेशात शाहीद कपूर आणि कियारा अडवाणी अभिनित कबीर सिंह (Kabir Singh) या चित्रपटाचा उल्लेख दोन वेळा आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रचंड गाजला; पण यातले काही संवाद महिलांना दुय्यम लेखणारे होते, याकडे मुंबई पोलिसांनी लक्ष वेधलं आहे. यातला एक संवाद असा आहे, ज्यात कबीर सिंह आपली गर्लफ्रेंड प्रीती हिला म्हणतो की, ‘प्रीती अपनी चुन्नी ठीक करो.’ आणि दुसरा संवाद असा आहे, की त्यात कबीर सिंह म्हणतो, ‘वो मेरी बंदी है. अशा प्रकारचे संवाद स्त्री-विरोधी असल्याचा आक्षेप पोलिसांनी नोंदवला आहे. अशा संवादावर समाजाने आणि चित्रपटसृष्टीनंही विचार करण्याची गरज असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

या दिवशी'झिम्मा' होणार प्रदर्शित; 7अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर करणार सिद्धार्थ..

या चित्रपटातल्या दृश्याचा फोटो शेअर करून त्यासोबत एक पोस्ट लिहिण्यात आली आहे. त्यात पोलिसांनी म्हटलं आहे, की 'चित्रपट (Films) हे आपल्या समाजाचं प्रतिबिंब (Reflection of Society) असतात. चित्रपटात वापरली जाणारी भाषा, आपल्या दैनंदिन जीवनात वापरली जाणारी भाषा हे आपल्या विचारांचं प्रतिबिंब असतं. त्यामुळे प्रत्येक शब्द जपून वापरा.' या पोस्टसोबत #LetsNotNormaliseMisogyny, #MindYourLanguage, #WomenSafety अशा हॅशटॅग्सचा वापरही करण्यात आला आहे.

तुम्ही आठवड्याला खाता इतकं Plastic, वाचून बसेल शॉक!

त्यामुळे शब्द वापरताना आणि कृती करताना काळजी घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागू शकतं, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

मुंबई पोलिसांच्या कल्पकतेला सोशल मीडियावर भरभरून दाद मिळत असून, ही पोस्ट वेगानं व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Bollywood, Mumbai Poilce