नांदेड 17 सप्टेंबर : नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातला आहे. पोलीस भरती झाली पाहिजे अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. रखडलेल्या भरती झाली पाहिजे, अशी मागणी देत विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्याने गोंधळ उडाला. यानंतर विद्यार्थ्यांना भेटून काहीही न बोलताच फडणवीस इथून रवाना झाले.
नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातला आहे. पोलीस भरती झाली पाहिजे अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज pic.twitter.com/fXBp3LrOQT
— News18Lokmat (@News18lokmat) September 17, 2022
विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याने पोलिसांनी याठिकाणी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर सौम्या लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात विद्यार्थ्यांनी फडणवीसांना घेराव घातल्याचं पाहायला मिळालं.
कार्यक्रम सुरू असताना स्टेजवरच मंत्र्याचं नितीन गडकरींसमोर लोटांगण; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
दरम्यान नांदेडमधील कार्यक्रमात बोलताना फडणवीस विरोधकांना उत्तर देत म्हणाले, की आजच्या दिवशी आरोप करून दिवसाचं महत्त्व करू नका. हा आजच्या दिवसाचा आपमान ठरेल. औरंगाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच्या वेळेआधी ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अपमान केला असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. यावर फडणवीस यांनी ही प्रतिक्रीया दिली.
हैद्राबाद येथे मुक्ती संग्राम दिनाचाच कार्यक्रम आहे. तीन राज्याचे मुख्यमंत्री तिथे आहेत. मुख्यमंत्र्यांना लवकर ध्वजारोहन करण्याची काही हौस नाही, असं सांगत आजच्या दिवशी राजकारण करू नये असं फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis