नवी दिल्ली 17 सप्टेंबर : मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री अनेकदा त्यांच्या वेगळ्या स्टाइलमुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांचा हा अनोखा अंदाज पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही हसू आवरलं नाही. ग्वाल्हेरला गेलेले नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री शिवराज यांचे आभार मानण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी मंचावरच नतमस्तक होण्यास सुरुवात केली.
ग्वाल्हेरमध्ये 1100 कोटींहून अधिक रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ग्वाल्हेरला पोहोचले होते. सर्व पाहुणे स्टेजवर होते. यावेळी व्यासपीठावर ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर बोलत होते. मग कृतज्ञता व्यक्त करत ते पाहुण्यांसमोर पोहोचले आणि डोकं जमिनीवर टेकवून नमस्कार केला. हे दृश्य पाहून गडकरींसह सर्वांना हसू फुटले.
मोदी के मंत्री नितिन गडकरी के चरणों में एमपी के ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर एक संमारोह में। ग्वालियर में आयोजित एक संमारोह का दृश्य@PradhumanGwl @nitin_gadkari @narendramodi @nstomar #BJP pic.twitter.com/v81FZuuAOl
— Dev Shrimali (@DevShrimali8) September 15, 2022
ग्वाल्हेर-चंबळ झोनला 1128 कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या सात रस्ते प्रकल्पांची भेट मिळणार आहे. गडकरी यांच्या हस्ते 222 किलोमीटर लांबीच्या प्रमुख रस्त्यांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले. शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या स्वर्णरेखा नदीवर एलिव्हेटेड रोड तयार करण्यात येणार आहे. हा सिंधिया यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं मानलं जातं. सुमारे 447 कोटी रुपये खर्चून या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम केले जाणार आहे. त्यापैकी केंद्र सरकारकडून सुमारे 406 कोटी रुपये आणि राज्य सरकारने सुमारे 41 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट, ED ने संजय राऊतांविरोधात टाकलं पुढचं पाऊल!
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह सर्व मंत्री पोहोचले. त्याचबरोबर 829 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या रस्त्याचे भूमिपूजनही करण्यात आले. राज्यातील नदीवर बांधण्यात येणारा हा पहिलाच फ्लाईओव्हर रोड असेल. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ग्वाल्हेर आता विकासाच्या वाटेवर धावत आहे, लवकरच एलिव्हेटेड रोल्पा फेज वन आणि फेज दोनचे काम पूर्ण होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nitin gadkari