जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अ‍ॅक्शन मोड, कामचुकार कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अ‍ॅक्शन मोड, कामचुकार कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा

ओबीसी आरक्षणासाठी डेटा तयार होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव मंजूर करण्यात आला

ओबीसी आरक्षणासाठी डेटा तयार होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव मंजूर करण्यात आला

रस्त्यांची दुरुस्ती (Road Repairs) आणि उपाययोजनांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आढावा घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 सप्टेंबर: रस्त्यांची दुरुस्ती (Road Repairs) आणि उपाययोजनांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आढावा घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कामचुकार कंत्राटदारांवर (Contractors) कारवाई करण्याचा थेट इशारा दिला आहे. तसंच कामे दर्जेदार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्याही सूचना दिल्यात. राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र या निधीचा विनियोग व्यवस्थित झाला नाही, कामचुकारपणा केल्याचं निदर्शनास आलं तर संबंधित कंत्राटदाराची गय केली जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांना इशारा दिला आहे. तसंच या रस्त्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर आहे त्यालाही जबाबदार धरून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. हेही वाचा-  VIDEO : मागून दबकत येत अंगणात बसलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; CCTV मध्ये थरारक दृश्य कैद राज्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासह या कामांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांना दिले आहेत.

जाहिरात

बुधवारी राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील खड्ड्यांच्या दुरुस्ती आणि उपाययोजनांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत आढावा घेतला. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसंच कोकण, नाशिक, मराठवाडा, पुणे आदी विभागांचे मुख्य अभियंते, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अभियंते देखील उपस्थित होते. यानेळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम लवकर मार्गी लावण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजवताना गुणवत्तेवर भर देण्यासही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाची गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली रस्त्यांची कामे तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या. हेही वाचा-  KhakiStudio : ‘ऐ वतन तेरे लिऐ’, मुंबई पोलीस बँण्डची खास धून सोशल मीडियावर हिट पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, संपूर्ण रस्त्यांची कामे ही दर्जेदार झाली पाहिजेत. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. रस्त्यांच्या कामात गुणवत्तेवर सर्वोच्च भर देण्याबरोबरच रस्त्यांच्या कामासाठी कृती आराखडा तयार करा. तसंच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही मात्र निधीचा विनियोग योग्य प्रकारे केला नाही आणि कामात गुणवत्तेवर भर दिला गेला नाही तर कामचुकार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्री ठाकरेंनी यावेळी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात