मुंबई, 29 सप्टेंबर : गोरेगाव पूर्वकडील (Goregaon East) आरे कॉलनीत बिबट्यांचं (leopard attacks a woman near Aarey Dairy) भय दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. आज पुन्हा एकदा बिबट्याने घराच्या अंगणात बसलेल्या महिलेवर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्याच महिलेचा जीव बचावला आहे. दरम्यान या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर (leopard attacks Video Viral) आला आहे. गेल्या तीन दिवसातील हा दुसरा हल्ला आहे. 26 सप्टेंबर रोजी 4 वर्षांच्या मुलावरही बिबट्याने हल्ला केला होता.
बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भय परसलं आहे. गेल्या आठवड्यात 4 वर्षांच्या रोहितवर (child attacked by the leopard) एका बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये रोहितच्या वडिलांनी बिबट्याला हाकलून लावले. त्यामुळे आरे कॉलनीत राहणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
बुधवारी (29 सप्टेंबर) झालेल्या हल्ल्याच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला घराच्या अंगणात बसली आहे. याचवेळी मागून बिबट्याच्या डोळे चमकताना दिसत आहे. बिबट्या मागून महिलेवर हल्ला करतो.
हे ही वाचा-भयंकर! बॉयफ्रेड सोडून गेल्यामुळे गर्लफ्रेंड चिडली; दगडाने ठेचून केली हत्या
महिला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू करते. यावेळी तिच्या हातात काठी असते आणि ती ही काठी बिबट्यावर उगारू लागते. त्यामुळे बिबट्या जरा मागे होते. दरम्यान बिबट्या तेथून पळ काढतो. तेवढ्यात घरातील मंडळी बाहेर येतात. आणि महिलेचा यातून जीव वाचतो.
गोरेगाव पूर्वकडील आरे कॉलनीत बिबट्याचं भय दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. आज पुन्हा एकदा बिबट्याने अंगणात बसलेल्या महिलेवर हल्ला केला. या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. pic.twitter.com/a0fkaRODt1
— News18Lokmat (@News18lokmat) September 29, 2021
रविवारी सायंकाळी साधारण 8 वाजता आरे कॉलनी युनिट नंबर 3 मध्ये सुनील मिश्रा यांच्या तबेल्यात काम करणारे अरूण यादव यांचा 4 वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्या त्याला उचलून घेऊन जात होता. सुदैवाने अरूणने हे पाहिलं आणि तो आरडाओरडा करू लागला. त्यानंतर बिबट्याने बाळाला सोडून पळ काढला. अरूणने सांगितलं की, जर तो वेळेत आला नसता तर मोठा अपघात घडला असता. मात्र बिबट्याच्या हल्ल्यामुळे 4 वर्षांच्या बाळाच्या अंगावर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.