Home /News /mumbai /

KhakiStudio : 'ऐ वतन तेरे लिऐ', मुंबई पोलीस बँण्डची खास धून सोशल मीडियावर हिट

KhakiStudio : 'ऐ वतन तेरे लिऐ', मुंबई पोलीस बँण्डची खास धून सोशल मीडियावर हिट

मुंबई पोलिसांच्या बँडनेही नेटिझन्सकडून खूप प्रशंसा मिळवली असून आता 'खाकी स्टुडिओ' चा एक नवीन व्हिडिओ व्हायरल (Mumbai police video) होत आहे. मुंबई पोलीस बँडच्या नवीन व्हिडिओमध्ये पोलीस 1986 मधील कर्मा चित्रपटातील गाणे वाजवताना दिसत आहेत.

पुढे वाचा ...
  मुंबई, 29 सप्टेंबर : कोविड-19 प्रोटोकॉलबद्दल जागरूकता निर्माण करण्यापासून ते नियम मोडणाऱ्या लोकांबद्दल मजेदार पोस्ट शेअर करण्यापर्यंत मुंबई पोलीस (Mumbai Police) सोशल मीडियावर अॅक्टीव असतात. त्यांच्या विविध उपक्रमांचे लोकांकडून कौतुक होत असते. आता मुंबई पोलिसांच्या बँडनेही नेटिझन्सकडून खूप प्रशंसा मिळवली असून आता 'खाकी स्टुडिओ' चा एक नवीन व्हिडिओ व्हायरल (Mumbai police video) होत आहे. मुंबई पोलीस बँडच्या नवीन व्हिडिओमध्ये पोलीस 1986 मधील कर्मा चित्रपटातील गाणे वाजवताना दिसत आहेत.
  हा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये पोलीस अधिकारी कर्मा चित्रपटातील 'ए वतन तेरे लिऐ' ची धून वाजवताना दिसतात. व्हिडिओमध्ये, सर्व तालबद्द संगीत प्रदर्शित करत असल्याचे दिसत होते. सर्व पोलिसांचा सूरांच्या या कार्यक्रमात उत्तम ताळमेळ बसल्याचे दिसत आहे.  व्हिडिओ शेअर करताना मुंबई पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'ए वतन तेरे लिऐ ... खाकी स्टुडिओ ... कर्मा ... मुंबई पोलिस बँड ... दिल दिया है जान भी देंगे ... ऐ वतन तेरे लिऐ! #खाकीस्टुडिओने ए वतन… कर्मा चित्रपटातील या प्रसिद्ध गाण्याची धून गात त्यांनी देशभक्ती व्यक्त केली. मुंबई पोलिसांच्या हँडलने व्हिडिओ शेअर करताच नेटिझन्सनी कमेंटमध्ये त्यांचे कौतुक केलं आहे. एका वापरकर्त्याने लिहिलंय, 'भारतीय लष्कर आणि महाराष्ट्र पोलिसांना सलाम' दुसऱ्याने लिहिले, 'बॉम्बे पोलीस .. दररोज, आम्हाला  तुमचा अभिमान बाळगण्याची संधी देता! आणि यामुळे मला आणखी आनंद होतो. 'तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलंय,' हा व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि गाणंही सुरुवातीपासून छान आहे. 'दुसऱ्याने लिहिलंय,' मुंबई पोलीस बँड को मेरा सलाम..जय हिंद. ' हे वाचा - VIDEO : मागून दबकत येत अंगणात बसलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; CCTV मध्ये थरारक दृश्य कैद मुंबई पोलीस बँडचा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी त्यांनी जेम्स बाँडची थीम वाजवली होती आणि त्यालाही नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Mumbai Poilce

  पुढील बातम्या