मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अजूनही मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचा डाव, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

अजूनही मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचा डाव, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

 उत्तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री पदासाठी अनेक पात्र उमेदवार असतानाही उत्तर महाराष्ट्राला संधी मिळाली नाही.

उत्तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री पदासाठी अनेक पात्र उमेदवार असतानाही उत्तर महाराष्ट्राला संधी मिळाली नाही.

उत्तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री पदासाठी अनेक पात्र उमेदवार असतानाही उत्तर महाराष्ट्राला संधी मिळाली नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी

जळगाव, 05 फेब्रुवारी : 'मंत्रिपदाचे राजीनामे देण्याआधी जे आक्षेप माझ्यावर घेण्यात आले ते घडवून केलेलं षडयंत्र होतं. न्यायालयाच्या संरक्षणामुळे त्यादिवशी माझी अटक टळली. अजूनही मला काही प्रकरणांमध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे एकनाथ खडसे अडचणीत सापडले. खडसेंनी आपल्या जावयांच्या अटकेबाबत घडलेली आपबिती सांगितली.

'मंत्रिपदाचे राजीनामे देण्याआधीचे आक्षेप माझ्यावर घेण्यात आले ते घडवून केलेलं षडयंत्र असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

('टिळकांवर अन्याय, ब्राह्मण नाराज', हिंदू महासंघ कसबा लढण्याच्या तयारीत, भाजपचं टेन्शन वाढणार?)

तसंच, 'न्यायालयाच्या संरक्षणामुळे माझी अटक केली मात्र ईडीने चौकशीसाठी गेलेल्या जावयांना तात्काळ अटक केली. अजूनही मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गौप्यस्फोट खडसेंनी केला आहे.

(कसबा पोटनिवडणुकीवरून भाजपने नाराजीचा उद्रेक, उमेदवारी न मिळाल्यामुळे शैलेश टिळक स्पष्टच बोलले)

खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री झालेला नाही व होऊ दिला नाही, असे वक्तव्य करत मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ खडसेंनी पुन्हा खंत व्यक्त केली आहे. उत्तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री पदासाठी अनेक पात्र उमेदवार असतानाही उत्तर महाराष्ट्राला संधी मिळाली नाही. सुरेश जैन असतील अथवा एकनाथ खडसे मात्र आम्हालाही मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही हे उत्तर महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: एकनाथ खडसे