मराठी बातम्या /बातम्या /पुणे /कसबा पोटनिवडणुकीवरून भाजपने नाराजीचा उद्रेक, उमेदवारी न मिळाल्यामुळे शैलेश टिळक स्पष्टच बोलले

कसबा पोटनिवडणुकीवरून भाजपने नाराजीचा उद्रेक, उमेदवारी न मिळाल्यामुळे शैलेश टिळक स्पष्टच बोलले

'ब्राम्हण समाजात अस्वस्थता असल्याचं सांगत कुटुंबीयात उमेदवारी दिली असती तर बिनविरोध निवडणूक झाली असती

'ब्राम्हण समाजात अस्वस्थता असल्याचं सांगत कुटुंबीयात उमेदवारी दिली असती तर बिनविरोध निवडणूक झाली असती

'ब्राम्हण समाजात अस्वस्थता असल्याचं सांगत कुटुंबीयात उमेदवारी दिली असती तर बिनविरोध निवडणूक झाली असती

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 04 फेब्रुवारी : पुण्यात कसबा पोटनिवडणुकीमुळे भाजपमध्ये नाराजीचा स्फोट झाला आहे. हेमंत रासने यांच्या उमेदवारीवरून शैलेश टिळक नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. भाजप नेतृत्वाच्या निर्णयावर टिळक यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपकडून उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासनेंना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयावर शैलश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली.

'ब्राम्हण समाजात अस्वस्थता असल्याचं सांगत कुटुंबीयात उमेदवारी दिली असती तर बिनविरोध निवडणूक झाली असती आता ब्राम्हण समाजाचं नेतृत्व करणारा एकही उमेदवार नाही यांची खंत वाटते, असं म्हणत शैलेश टिळक यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करू दिली. शैलेश टिळक हे इच्छुक होते. पण, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

(kasaba bypoll election : टिळकांच्या वाड्याला नकार, कसब्यातून भाजपकडून नवीन उमेदवार जाहीर)

दरम्यान, 'शुक्रवारी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली होती. भाजपचे नेतृत्व हे त्यांच्या पाठिशी आहे. ते पक्षातच राहणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. पण, त्यांच्या वक्तव्यानंतर शैलेश टिळक यांनी प्रतिक्रिया आली आहे.

(उद्धव ठाकरेंना वेळोवेळी सांगत होतो पण..; राऊतांचा अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याला दुजोरा)

'टिळक कुटुंबीयांची शु्क्रवारी रात्री भेट घेतली. त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला आहे. कुणाल टिळक यांना प्रदेश प्रवक्ता केलं आहे आणि टिळक कुटुंबीयांसोबत आम्ही सोबत आहोत. आगामी काळामध्ये मोठी जबाबदारी दिली जाईल. कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली तर विरोधक ही पोटनिवडणूक बंद करतील, असा कोणताही प्रस्ताव नव्हता. त्यांची वेगळी गणितं दिसत आहेत, म्हणून निर्णय घेतला आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

तसंच, अपेक्षेनुसार अश्विनी जगताप आणि हेमंत रासने यांची नाव केंद्रातून घोषित झालेली आहे. केंद्राचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, त्यांना विधानसभेत जाण्याची संधी दिली. दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांचे पती आणि मुलाला पक्षात योग्य ते स्थान दिलं जाईल तसं अश्वस्त केलं आहे, असंही पाटील म्हणाले,

First published: