मुंबई, 23 सप्टेंबर: मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचं धुमशान सुरूच आहे. शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडाली. लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली. पण असं असतानाही पाऊस काही थांबवण्याचं नाव घेत नाही.
मुंबईत उद्भवलेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली. सप्टेंबरमध्ये जितका पाऊस होतो तितका एका दिवसांत म्हणजेच 80 टक्के पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर मुंबईत पंपिंग स्टेशनसोबत आता मुंबईत फ्लड कंट्रोल टॅंक उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी जमिनीचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.
हेही वाचा...39 वर्षांनी मुंबईत इतिहासाची पुनरावृत्ती; 23 सप्टेंबरच्या पावसाचं हे आहे कनेक्शन
तुलसी लेक इतके पाणी मुंबईतून उपसा केला जात असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला. पाऊस पडल्यावर पुढे काय करायचं? यावर आदित्य यांनी मनपा अधिकाऱ्यां चर्चा केली. क्लायमेंट चेंज प्रकार दिसत असल्याचं आदित्य यांनी यावेळी सांगितलं.
Visited the @mybmc HQ today to take stock of the situation after the torrential rains that lashed the city over the last night.
• Parts of Mumbai have received over 83% of the annual normal September rainfall in less than 12 hours.
• flood water pumped out= 1 Tulsi lake pic.twitter.com/9HbDCv06MA
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 23, 2020
आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, मुंबईत महिनाभर पडणारा पाऊस अवघ्या 8 ते 12 तासांत पडला आहे. एवढा मोठा पाऊस पडल्यावर पुढे काय करायचं यावर आदित्य ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अतिवृष्टीमुळे मुंबईत पाणी साचलं आहे. धारावी व दादरमध्ये 332 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. पावसाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.
मुंबईकरांनो सावधान! हवामान विभागानंदिला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा!
दरम्यान, मुंबईत पावसाचा धुमाकूळ सुरूच असताना हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि किनारपट्टीच्या परिसरात पुढचे 24 तास हे मुसळधार पावसाचे असतील असं या अलर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. मंगळवारी रात्री विक्रमी पाऊस झाल्याने मुंबईत जागोजागी पाणी तुंबलं होतं. त्याचा आता कुठे निचरा सुरू झालेला असतांनाच हा नवीन इशारा आल्याने प्रशासनाचाही झोप उडणार आहे.
या पावसात वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून ठिक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढला असून पुढचे ती दिवस असेच वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
रात्रभरापासून मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं रात्री जोर धरला आणि मुंबईकरांची दाणादाण उडाली. लोकल सेवा पासून रस्त्याच्या वाहतुकीपर्यंत आणि दुकानांपासून ते घरापर्यंत अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली.
हेही वाचा...BREAKING: 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद! मराठा गोलमेज परिषदेत मोठी घोषणा
अत्यावश्यक सेवा वगळता आज मुंबई राहणार बंद
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.