कोल्हापूर, 23 सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. कोल्हापुरात बुधवारी झालेल्या मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. येत्या 10 ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद शांततेत केला जाणार आहे. 'महाराष्ट्र बंद' दरम्यान, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, 15 दिवसांत सरकारनं निर्णय घेतला तर 'महाराष्ट्र बंद' मागे घेऊ, असं मराठा आरक्षण समितीचे सुरेश पाटील यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा...मुंबईकरांनो सावध राहा, हवामान विभागाने दिला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा!
मराठा समाजातर्फे राज्यभर आंदोलनं केली जात आहेत तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात आज (बुधवारी) राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषद झाली. मराठा आरक्षणासाठी यापुढे 'थोबाड फोडो आंदोलन' करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही, असा इशारा मराठा गोलमेज परिषदेत मराठा समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांनी दिला आहे.
विजयसिंह महाडिक यांनी सांगितलं की, मराठा समाज आता गनिमी काव्यानं आंदोलन करणार आहे. गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्व सहमतीनं मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरू आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 'थोबाड फोडो आंदोलन' करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही. आरक्षणाला स्थगिती मिळताच पोलीस भरतीची घोषणा करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशीही केली मागणी करण्यात आली आहे.
गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव...
सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव नाराज झाले आहेत. मराठा समाजार्फे राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. दुसरीकडे, आज (बुधवारी) कोल्हापूर शहरात राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्व सहमतीनं मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरू आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
1. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.
2. मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा.
3. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.
4. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.
5. सारथी संस्थेला 1000 कोटींची आर्थिक तरतूद करावी.
6. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींची तरतूद करावी.
7. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी.
8. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे.
हेही वाचा...'बिहारकडून मिळालं बक्षीस'; डीजीपी गुप्तेश्वर पांडेयच्या VRS वर राऊतांचा टोला
9. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.
10. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.
11. स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी.
12. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.
13. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
14. कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी.
15. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.