जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जितेंद्र आव्हाड जिंकले.. कोरोना हरला! म्हणाले, तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असेच राहू द्या

जितेंद्र आव्हाड जिंकले.. कोरोना हरला! म्हणाले, तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असेच राहू द्या

जितेंद्र आव्हाड जिंकले.. कोरोना हरला! म्हणाले, तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असेच राहू द्या

एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल….

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 मे: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना व्हायरसवर यशस्वी मात केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती आता ठणठणीत असून ते सध्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आव्हाड यांना प्रथम ज्युपिटर रुग्णालयात आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. अखेर त्यांना गुरूवारी (7 मे) डिस्चार्ज देण्यात आला. आपला नेता ठणठणीत बरा झाल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, समर्थकांनी समाधान व्यक्त केलं आहे. हेही वाचा.. राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, भावजयीच्या नावावरील बियर बारला ठोकलं सील! जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या हितचिंतकांना, कार्यकर्त्यांसाठी खास ट्वीट केलं आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जाहिरात

‘डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही. त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये, अशी विनंती आव्हाड यांनी आपल्या हितचिंतकांना, कार्यकर्त्यांना केली आहे. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. हेही वाचा… धक्कादायक! कोरोनाने घेतला आणखी एका पोलिसाचा बळी, मुंबईत अधिकाऱ्याचा मृत्यू दरम्यान, जितेंद्र आव्हाड रुग्णालयात असताना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे स्वतः आव्हाडांच्या प्रकृतीबाबत माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देत होते.  उद्धव ठाकरेंनी स्वत: आव्हाड यांच्याशी फोनवरून संवाद साधत प्रकृतीबाबत विचारपूस केली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची काळजीने चौकशी केली. त्यावेळीही जितेंद्र आव्हाड यांनी एखाद्या विजयी योद्ध्याप्रमाणेच त्यांना उत्तर दिल्याचीही माहिती मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात