जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! कोरोनाने घेतला आणखी एका पोलिसाचा बळी, मुंबईत अधिकाऱ्याचा मृत्यू

धक्कादायक! कोरोनाने घेतला आणखी एका पोलिसाचा बळी, मुंबईत अधिकाऱ्याचा मृत्यू

धक्कादायक! कोरोनाने घेतला आणखी एका पोलिसाचा बळी, मुंबईत अधिकाऱ्याचा मृत्यू

महाराष्ट्र पोलिस दलात कोरोनामुळे सातव्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 मे: राज्यासह मुंबईतील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. रविवारी कोरोना व्हायरसमुळे आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलात कोरोनामुळे सातव्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात 7 पोलिस कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यात त्यात मुंबईत 5 तर पुणे, सोलापूर आणि नाशिक येथील एक-एक पोलिस कर्मचारीचा समावेश आहे. हेही वाचा..  भीषण अपघातात डॉक्टर पत्नीसह पती जागीच ठार, मुलाला आणण्यासाठी निघालं होतं दाम्पत्य उपपोलिस निरीक्षक सुनील दत्तात्रय कलगुटकर यांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते मुंबईतील विनोबा भावे पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. Mumbai Police regrets to inform about the unfortunate demise of ASI Sunil Dattatray Kalgutkar from Vinoba Bhave Nagar Police Station. ASI Kalgutkar had been battling Coronavirus. We pray for his soul to rest in peace. Our thoughts and prayers are with the Kalgutkar family. — Mumbai Police (@MumbaiPolice) May 9, 2020 दरम्यान, काल शनिवारी नाशिकमध्ये कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल साहेबराव झिप्रु खरे यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि आज त्यांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा..  सायकलवरून गावी निघालेल्या दाम्पत्याला वाहनाने चिरडलं, दोन चिमुकले झाले अनाथ दरम्यान, महाराष्ट्राभोवती कोरोना व्हायरसचा विळखा आता आणखी घट्ट होत आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच सर्वसामान्यांचे रक्षणकर्ते असलेल्या पोलिसांनाही कोरोनाने टार्गेट केलं आहे. राज्यभरातील पोलीस कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत. राज्यात शुक्रवारी 24 तासांत 75 पोलीस कोरोनाबाधित झाले होते. आता कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या 531 झाली आहे.  राज्यात आतापर्यंत एकूण 714 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातही चिंताजनक बाब म्हणजे मागील 24 तासांत 157 पोलीस कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 81 पोलीस अधिकारी आणि 633 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांचं मनोबल वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न कोरोनाच्या संकटात दिवस रात्र पोलीस बांधव, भगिनी हे कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावत असताना अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही पोलीसांचा मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे पोलीसांचं मनोबल वाढवण्यासाठी व त्यांना विश्वास देण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरेंनी वरळीतील पोलीसांसोबत संवाद साधला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात