राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, भावजयीच्या नावावरील बियर बारला ठोकलं सील!

राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, भावजयीच्या नावावरील बियर बारला ठोकलं सील!

भल्या पहाटे ही कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share this:

सांगली, 10 मे: इस्लामपुरातील महिला मुख्याधिकाऱ्यांला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेलचा स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांना अखेर रविवारी पोलिसांनी अटक केली. खंडेराव जाधव गेल्या 8-10 दिवसांपासून फरार होते. एवढंच नाही तर संबंधित बियर बारली पोलिसांनी सीट ठोकलं असून परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. इस्लामपूर पोलिसांनी भल्या पहाटे ही कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा...भीषण अपघातात डॉक्टर पत्नीसह पती जागीच ठार, मुलाला आणण्यासाठी निघालं होतं दाम्पत्य

काही दिवसांपूर्वी इस्लामपूर शहरातील कोरोना कंटेन्मेंट झोनमध्ये नगरपालिकेच्याच घंटा गाडीतून दारूच्या बाटल्यांची वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ही गाडी का ताब्यात घेतली? असा जाब विचारत खंडेराव जाधव यांनी थेट मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता.

काय आहे प्रकरण?

इस्लामपूर शहरातील करोनाबाधित कंटेन्मेंट झोनमध्ये नगरपालिकेच्याच घंटा गाडीतून दारूच्या बाटल्याची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला होता. याबाबत चौकशी सुरू झाल्यावर 28 एप्रिलला नगरसेवक खंडेराव जाधव यांनी थेट केबिनमध्ये घुसून नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. 'तुझे घराबाहेर निघणे मुश्किल करतो, तुला बघून घेतो, तुझ्या कुटुंबाला बघून घेतो,' अशी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा..धक्कादायक! कोरोनाने घेतला आणखी एका पोलिसाचा बळी, मुंबईत अधिकाऱ्याचा मृत्यू

याप्रकरणी खंडेराव जाधव यांच्याविरोधात इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला. अखेर रविवारी पहाटे पोलिसांनी खंडेराव जाधव यांना अटक केली आहे.

भावजयीच्या नावावरील बियर बारला सील!

खंडेराव जाधव यांच्याशी संबंधित हॉटेल न्यू राजभवन बिअर बारवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान या बारचा परवाना खंडेराव जाधव यांच्या भावजयीच्या नावावर आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत बारमधून मोठया प्रमाणात मद्य विक्री झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बियर बारचा परवाना सुद्धा कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

First published: May 10, 2020, 10:38 AM IST
Tags: ncp leader

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading