मोठी बातमी: सुशांत सिंह राजपूतबाबत कमाल खान लवकरच करणार मोठा गौप्यस्फोट!

मोठी बातमी: सुशांत सिंह राजपूतबाबत कमाल खान लवकरच करणार मोठा गौप्यस्फोट!

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं रविवारी (15 जून) आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला

  • Share this:

मुंबई, 17 जून: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं रविवारी (15 जून) आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. त्याच्या अचानक एक्झिटमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मात्र, यासोबतच बॉलिवूड पुन्हा एकदा घराणेशाहीचा वाद उफाळून आला आहे. सोशल मीडियावर करण जोहर, सलमान खान सारख्या सेलिब्रेटींना सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार धरत ट्रोल केलं जात असताना कमाल खान उर्फ केकेआर यांन एक धक्कादायक ट्वीट केलं आहे. सुशांत सिंह राजपूतबाबत एक व्हिडीओ शेअर करून आपण मोठा मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं कमाल खान यानं म्हटलं आहे.

हेही वाचा...सुशांतने आत्महत्येपूर्वी ट्विटरवर दिले संकेत? व्हायरल होतायेत स्क्रिनशॉट

बॉलिवूडमध्ये भट्ट ब्रदर्स सारखे लोक सुशांत सिंह राजपूतला 'सायको' घोषित करण्यावर टपले होते, असंही कमाल खान यानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आता कमाल खान केव्हा तो व्हिडीओ रिलिज करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर आतापर्यंत बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीवर कंगना रणौत, अभिनव कश्यप रवीना टंडन, शेखर कपूर यासारख्या सेलिब्रेटींनी वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता सलमान खान, करण जोहर यांच्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा... VIDEO : जिया खाननं 7 वर्षांपूर्वी केली आत्महत्या, आईनं सलमानवर लावले गंभीर आरोप

सुशांत सिंहकडे होते केवळ दोन मार्ग...

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतबाबत कमाल खान याचं एक जुनं ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. कमाल खान यानं ते फेब्रुवारीमध्ये केलं होतं. कमाल खानची कंपनी केआरके बॉक्स ऑफिसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हे करण्यात आलं होतं. सुशांत सिंह राजपूतला काही बड्या बॅनर्सनं बायकॉट केलं होतं. एवढंच नाही तर ट्वीटमध्ये धर्मा प्रॉडक्शन्स, साजिद नाडियाडवाला, वायआरएफ, टी-सीरीज, सलमान खान, दिनेश व्हिजन आणि बालाजीला टॅग केलं होतं. आता सुशांत सिंह राजपूतकडे केवळ दोन मार्ग आहेत. ते म्हणजे टीव्ही सीरियल्स किंवा वेब सीरीज.

First published: June 17, 2020, 7:27 PM IST

ताज्या बातम्या