मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ST employees Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन, साताऱ्यातील हृदयद्रावक घटना

ST employees Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन, साताऱ्यातील हृदयद्रावक घटना

साताऱ्यातील एसटी कर्मचाऱ्याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

साताऱ्यातील एसटी कर्मचाऱ्याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

ST employee died due to heart attack: एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना साताऱ्यातील एका एसटी कर्मचाऱ्याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

सातारा, 17 नोव्हेंबर : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना साताऱ्यातील एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. साताऱ्यातील (Satara) मेढा आगारामध्ये कार्यरत असलेले वाहक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांचा हृदयविकाराने दुर्दैवी निधन झालं आहे. तुटपुंज्या पगारामुळे आणि संपामुळे अनेक दिवस तणावाखाली होते. (Satara ST employee died due to heart attack)

रात्री उशिरा त्यांना त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. संतोष शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,आई, वडील, दोन लहान भाऊ असा परिवार आहे.

निलंबनाच्या भीतीने बुलडाण्यात एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत हजर राहण्याचे वारंवार आवाहन केलं मात्र, संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यातच एसटी महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. याच निलंबनाच्या कारवाईच्या भीतीने बुलढाण्यातील एका संपकरी कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात संपावर असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कुठलाच तोडगा निघत नाहीये. त्यातच सरकार एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करत आहे. त्यामुळे आपलेही निलंबन होईल या भीतीने खामगाव आगारात सहाय्यक तांत्रिक पदावर कार्यरत असलेल्या विशाल याने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

सांगलीतही संपकरी एसटी कर्मचाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

11 नोव्हेंबर रोजी सांगलीतही एका एसटी कर्मचाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र निवृत्ती पाटील असे मृत एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजेंद्र पाटील हे सांगलीतील आपल्या राहत्या घरी असताना त्यांना ह्रदयविकाराच्या झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला एसटी संप आणि त्यातच सुरु करण्यात आलेली निलंबनाची करावाई या सर्वांमुळे राजेंद्र चिंतेत असल्याचं बोललं जात आहे.

एसटी संपाच्या विवंचनेतून ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत पाटील यांच्या मृतदेहावर कवलापूर या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शासनाने एसटी कर्मचारी आर एन पाटील यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची मागणी पुढे येत आहे.

मृत आर एन पाटील हे 17 वर्षांपासून एसटी सेवेत वाहक म्हणून काम करत होते. एसटीच्या संपाच्या पहिल्या दिवशी ते आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर ते गेली तीन दिवस आंदोलनाकडे आले नाही. या दरम्यान ते एसटीच्या संपाबाबत सर्व कर्मचारी यांच्याशी सातत्याने संपर्कात होते. तर आपल्या नोकरी बाबत ते सतत सर्वांशी बोलत चर्चा करत असायचे. एसटीचा संप लांबत चालल्याने पाटील हे तणावात होते. आज सकाळी ते घरीच असताना त्यांना चक्कर आली. यावेळी नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सांगली सिव्हीलला दाखल केले मात्र त्याठिकाणी त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले.

First published:

Tags: Satara, ST, Strike