• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • ST employees strike: निलंबनाच्या भीतीने बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

ST employees strike: निलंबनाच्या भीतीने बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

ST employees strike: संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये.

 • Share this:
  राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलढाणा, 17 नोव्हेंबर : राज्य परिवहन महामंडळाचे (Maharashtra State Transport) कर्मचारी संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST employees strike) अद्यापही कोणताही तोडगा निघालेला नाहीये. महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत हजर राहण्याचे वारंवार आवाहन केलं मात्र, संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यातच एसटी महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. याच निलंबनाच्या कारवाईच्या भीतीने एका संपकरी कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. (ST employee attempts suicide over fear of suspension) बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात संपावर असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कुठलाच तोडगा निघत नाहीये. त्यातच सरकार एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करत आहे. त्यामुळे आपलेही निलंबन होईल या भीतीने खामगाव आगारात सहाय्यक तांत्रिक पदावर कार्यरत असलेल्या विशाल याने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करायच्या का ? असा सवाल एसटी कर्मचारी विचारत आहेत. वाचा : 'ज्यांना कामावर जायचे जाऊ द्या, वैयक्तिक घोषणा देऊ नका', कोर्टाने ST संघटनेला फटकारले चित्रा वाघ यांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे न घेण्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. संपावर तोडगा निघत नसताना परिवहन महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. याच दरम्यान आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांना पत्र लिहून एक विनंती केली आहे. पत्रास कारण की... एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा.. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात चित्रा वाघ यांनी म्हटलं, "आपल्याला माहित आहे की, गेले 5 दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाची सरकार दरबारी योग्य ती दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत." आपल्या पत्रात त्यांनी पुढे म्हटलं, "दादा, आपण आत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आत्त्ही आपण या प्रकऱणात लक्ष घातलं तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते. अजून कोणत्या कर्मचाऱ्याने आत्महत्याचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे याची आपण त्वरीत दखल घ्यावी ही अपेक्षा."
  Published by:Sunil Desale
  First published: