औरंगाबाद, 12 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलगीकरण करून घेण्याच्या मागणासाठी एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संप (st bus strike) अजूनही सुरूच आहे. या आंदोलनात भाजपचे (bjp) नेते सहभागी झाले आहे. भाजप या संपाच्या आड सरकार मोडून काढण्यासाठी उठणार असेल तर जनता त्यांना मोडून काढेल' अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली.
औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वतीने महागाई विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी संजय राऊत हे औरंगाबादमध्ये दाखल झाले. यावेळी संजय राऊत यांच्या हस्ते ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील घडामोडीवर त्यांनी भाष्य केलं.
'उद्याच्या महागाई विरुद्ध असलेल्या मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी आलो आहे. जी राज्यात महागाई भडकली त्या निषेधार्थ आम्ही मोर्चा काढणार आहोत. देशभरात महागाई वाढली आहे, कुणी त्याविरोधात आवाज उठवायला तयार नाही. त्यामुळे हा आक्रोश आम्ही उठवणार आहोत, असं राऊत म्हणाले.
'त्रिपुरातील अन्याय विरुद्ध महाराष्ट्रात दंगल करण्याचं कारण नाही, त्रिपुरातल्या परिस्थितीबद्दल आम्हालाही चिंता आहे. राज्यात सर्वधर्म समभाव राखणारे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. सीमेवर असलेल्या राज्यामध्ये शांतता ठेवणे गरजेचं आहे, पण भाजपला देशात अशांतता निर्माण करून निवडणुकांना सामोरं जायचं आहे, असंही राऊत म्हणाले.
आदित्य चोप्राची ओटीटीवर एन्ट्रीची तयारी; करणार 500 कोटींची गुंतवणूक
'एसटी महामंडळाचा तिढा सुटेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. ते दोन दिवसात येतील आणि हे प्रश्न सुटेल. भाजप या संपाच्या आड सरकार मोडून काढण्यासाठी उठणार असेल तर जनता त्यांना मोडून काढेल, हा संप शिवसेना मोडून काढणार नाही, असंही राऊत म्हणाले.
'मागच्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष 2 पाऊल फेकले गेले, कारण सध्या दुसरा बंदूक चालवतोय आपण त्याला दारुगोळा द्यायचा असतो, असं म्हणत राऊत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.
अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, गृहमंत्र्यांचं राज्यातील जनतेला आवाहन
'रोज सकाळी कॅमेरावाले मी जिथे जाईन तिथे सर्व मीडिया हजर असते. माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाहीतर शिवसेनेवर प्रेम करतात. सरकार बनवण्यामध्ये मीडियावाले यांचेही मोठे योगदान आहे. आता महाराष्ट्रात काहीही होवो मात्र मुंबई आणि औरंगाबादमध्ये शिवसेना हवीच आहे.औरंगाबाद महापालिकेवर भगवा असणे ही औरंगाबादची गरज आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.