मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, गृहमंत्र्यांचं राज्यातील जनतेला आवाहन

अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, गृहमंत्र्यांचं राज्यातील जनतेला आवाहन

'राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा'

मुंबई, 12 नोव्हेंबर : त्रिपुरा (tripura violence) राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांचे पडसाद राज्यात उमटले. ठिकठिकाणी निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले होते. पण, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, पसरवूही नका. गृहमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, राज्याची जनतेनं शांतता व संयम राखावा, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी केलं आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

आज राज्यात ठिकठिकाणी  आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

तसंच, राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे  कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे.

प्रजेला मोफत निरोध वाटणारा CONDOM KING, सोबत देतो मोलाचा संदेश

तसंच पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

First published: