SPECIAL REPORT : भाजपमध्ये महाभारत, फडणवीस समर्थक Vs मुंडे समर्थक राडा!

SPECIAL REPORT : भाजपमध्ये महाभारत, फडणवीस समर्थक Vs मुंडे समर्थक राडा!

एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावरून देवेंद्र फडणीसांविरोधात जनू रणशिंग फुंकलंय

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : भाजपातील  कुरघोडीच्या राजकारणावरून आता पक्षात महाभारत सुरू झालंय. एकीकडं फडणवीस समर्थक विरुद्ध मुंडे समर्थक अशी जुगलबंदी रंगली आहे. तर प्रदेशाध्यक्षांनी  बंडखोरांची गय केली जाणार नसल्याचा इशार दिला आहे.

भाजप नेत्यांमधली धुसफूस आता जगजाहीर झाली आहे. गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. खरंतर त्यामुळे भाजपची चांगलीचं  कोंडी झाली आहे. गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना सबुरीचा सल्ला देणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा सूर बदलला आहे.

भाजपातील काही ओबीसी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आघाडी उघडल्याचं सध्या चित्र निर्माण झालं आहे. मात्र, त्यावरून आता भाजपात महाभारत सुरू झालंय. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे  यांनी पंकजा मुंडे यांच्यावर खरमरीत टीका केली.

काकडे हे फडणवीस समर्थक मानले जातात. तर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनीही त्याला सडेतोड उत्तर दिलंय.

काल केलेल्या भाषणातले मुद्दे पाच वर्षात अंमलात आणले असते तर एक लाख मताधिक्याने विजय झाला असता. पाच वर्षे तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही तुमचा मतदारसंघ सांभाळू शकला नाहीतर राज्य भर दौरे काढून काय दिवे लावणार, अशी टीका काकडेंनी केली.

एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावरून देवेंद्र फडणीसांविरोधात जणू  रणशिंग फुंकलंय. त्याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली असली तरी निवडणूक निकालापासूनचं ही धुसफूस सुरू झाली होती. नाराज खडसे यांनी नुकतेच दिल्लीत जावून शरद पवारांची भेट घेतली होती.

एवढंच नव्हे तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. खडसेंनी पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे तर पंकजा मुंडेंनी गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पक्षाला सूचक इशारा दिला.

बंडखोरांची गय केली जाणार नसल्याचं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं असलं तरी या दोन्ही नेत्यांवर कारवाई करणं पक्षाला राजकीय दृष्ट्या परवडणारं नाही. त्यामुळे आगामी काळात भाजप कोणती भूमिका हे पाहाणं औत्सुक्याचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 11:41 PM IST

ताज्या बातम्या