...म्हणून अजितदादांनी राजीनामा दिला, शरद पवारांनी केला मोठा खुलासा

'राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही माहिती नव्हती'

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 09:08 PM IST

...म्हणून अजितदादांनी राजीनामा दिला, शरद पवारांनी केला मोठा खुलासा

पुणे, 27 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही माहिती नव्हती, असा मोठा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. पुण्यात ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, आज दुपारी बैठका सुरू असताना राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाच्या नेते अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यांनी आमच्या कुणाशीही चर्चा केली नव्हती. मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क केला तर त्यांनी दिलेलं कारण समजलं. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी माझ्या नावाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे अजित पवार हे अस्वस्थ होते. राज्यातील राजकारणाची पातळी खालावली आहे. यातून बाहेर पडावं असा सल्लाही त्यांनी आपल्या मुलाला दिला होता, असंही पवारांनी सांगितलं. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे अजित पवार नाराज झाले होते. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर चर्चा करेन, असंही पवार म्हणाले.

दरम्यान, शिखर बँक प्रकरणी ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी उत्तर देण्यासाठी आज ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल २४ तारखेला मी जाहीर केलं होतं. त्यानुसार, आज गेलो होता. परंतु, काल संध्याकाळी ईडीच्या संचालकांनी मला न येण्याची विनंती केली होती. परंतु, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मला तिथे जाऊन आपली भूमिका मांडावी अशी विनंती केली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी मला दोन वेळा विनंती केली की, कायदा सुवव्यस्थेची परिस्थिती विपरीत होऊ नये, म्हणून त्यांनी विनंती केली. त्यामुळे तिचा स्वीकार केला आणि ईडी कार्यालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही, अशी माहितीही पवारांनी दिली.

अजित पवारांचा राजीनामा

Loading...

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदराकीचा राजीनामा दिलाय. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पवारांचा राजीनामा मंजूर केलाय. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरूवात झाली असतानाच पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय. अजित पवार यांनी ई मेलवरून बागडेंना राजीनामा पाठवला आणि त्यांच्याशी फोनवर बोलून घेतलं. अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्याविरुद्ध ED ने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. राजीनामा पत्रात कारण नाही दिलेले, फक्त राजीनामा मंजूर करावा अशी विनंती केली. विधानसभा अध्यक्ष यांनी राजीनामा मंजूर केला.

==================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2019 09:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...