मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /हृदयद्रावक! सीमेवर युद्धात दोनदा जिंकले पण नात्यात झाली हार; पोटच्या लेकानं माजी सैनिकाला ठेचलं दगडाने

हृदयद्रावक! सीमेवर युद्धात दोनदा जिंकले पण नात्यात झाली हार; पोटच्या लेकानं माजी सैनिकाला ठेचलं दगडाने

Murder in Nanded: नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अर्धापुरातील लहुजी नगर येथील रहिवासी असणाऱ्या एका माजी सैनिकाची त्यांच्याच मुलाने निर्घृण हत्या (former soldier brutal murder) केली आहे.

Murder in Nanded: नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अर्धापुरातील लहुजी नगर येथील रहिवासी असणाऱ्या एका माजी सैनिकाची त्यांच्याच मुलाने निर्घृण हत्या (former soldier brutal murder) केली आहे.

Murder in Nanded: नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अर्धापुरातील लहुजी नगर येथील रहिवासी असणाऱ्या एका माजी सैनिकाची त्यांच्याच मुलाने निर्घृण हत्या (former soldier brutal murder) केली आहे.

पुढे वाचा ...

नांदेड, 08 नोव्हेंबर: नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अर्धापुरातील लहुजी नगर येथील रहिवासी असणाऱ्या एका माजी सैनिकाची त्यांच्याच मुलाने निर्घृण हत्या (former soldier brutal murder) केली आहे. संबंधित माजी सैनिकाचा 1965 आणि 1971 साली भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्यात सक्रीय सहभाग होता. सीमेवर दोनदा शत्रू देशांसोबत जिंकले पण नात्यात मात्र त्यांची हार झाली आहे. शनिवारी 6 नोव्हेंबर रोजी पोटच्या मुलाने त्यांना भयावह मृत्यू (former soldier murdered by son) दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक (Accused son arrested) केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

नारायणराव लक्ष्मण साबळे असं हत्या झालेल्या माजी सैनिकाचं नाव आहे. ते नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील लहुजी नगर येथे वास्तव्याला होते. दरम्यान, 6 नोव्हेंबर रोजी दुपारी नारायणराव साबळे आणि आपला मुलगा विजय साबळे यांच्यात जुन्या भांडणातून पुन्हा वाद उफाळला. यापूर्वी देखील बापलेकात अनेकदा वाद झाला होता. पण शनिवारी झालेला वाद विकोपाला गेला. यामुळे आरोपी मुलगा विजय याने आपल्या वडिलांना लाथा-बुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली. यामध्ये आरोपी मुलाच्या पत्नीचा आणि मुलाचा देखील या मारहाणीत सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा-घोटभर पाण्यासाठी मालकानं घेतला जीव; बेदम मारहाणीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

लेकाने केलेल्या जबरी मारहाणीत माजी सैनिक नारायणराव साबळे हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच, मृत साबळे यांचा धाकटा मुलगा दिलीप साबळे आणि त्यांची पत्नी गयाबाई यांनी तातडीने साबळे यांना अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण रुग्णालयात नेलं असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत साबळे यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं.

हेही वाचा-मांडूळच्या आमिषाने बोलावून केला घात; कोल्हापुरातील माजी सैनिकाचा बुलडाण्यात खून

सेवानिवृत्त सैनिक नारायणराव साबळे यांच्या खून प्रकरणी मुलगा दिलीप नारायण साबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. मृताच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मुलगा विजय नारायणराव साबळे याच्यासह त्याचा मुलगा शुभम साबळे आणि पत्नी विरोधात विविध कलमाअंतर्गत अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास अर्धापूर पोलीस करत आहेत. मृत साबळे यांचा 1965  आणि 1971 सालच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये सहभाग होता. या युद्धामध्ये त्यांच्या मांडीला एक गोळी लागली होती. यामुळे त्यांना काही प्रमाणात अपंगत्व देखील आलं होतं.

First published:

Tags: Murder, Nanded