मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एक घाव अन् खेळ खल्लास; नांदेडात पोटच्या लेकानं जन्मदात्याला दिला भयावह मृत्यू, धक्कादायक कारण समोर

एक घाव अन् खेळ खल्लास; नांदेडात पोटच्या लेकानं जन्मदात्याला दिला भयावह मृत्यू, धक्कादायक कारण समोर

Murder in Nanded: नांदेड जिल्ह्यातील हदगाव याठिकाणी एक हृदयपिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या 70 वर्षीय जन्मदात्या बापाची निर्घृण हत्या (son brutally murdered father) केली आहे.

    नांदेड, 24 नोव्हेंबर: नांदेड (Nanded) जिल्ह्यातील हदगाव याठिकाणी एक हृदयपिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या 70 वर्षीय जन्मदात्या बापाची निर्घृण हत्या (son brutally murdered father) केली आहे. नराधम आरोपी मुलानं बाजेचा ठावा वडिलांच्या डोक्यात घालून जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, त्याने आपल्या वयोवृद्ध आईला देखील बेदम मारहाण (Son beat mother and father) केली आहे. या मारहाणीनंतर वडिलांना रुग्णालयात घेऊन जात असताना, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली (Father death) आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलाला अटक (Accused son arrested) केली आहे. माधव दशरथ घंगाळे असं हत्या झालेल्या 70 वर्षीय वडिलांचं नाव असून ते हदगाव तालुक्यातील तुळणी येथील रहिवासी आहे. मृत घंगाळे हे अपंग असून गावात पिठाची गिरणी चालवून आपला उदरनिर्वाह भागवतात. त्यांना अर्धांगवायू झाल्याने ते घरीच राहतात, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला निराधार योजनेचे मानधन मिळालं होतं. तर आरोपी मुलगा संजय घंगाळे हा पूर्णपणे दारूच्या आहारी गेला होता. दारू पिण्यासाठी तो नेहमी आपल्या वयोवृद्ध आई वडिलांकडे पैशांची मागणी करायचा. हेही वाचा-संतापजनक! पत्नी रुसल्याचा आला राग, काठीने मारून केला खून दरम्यान, घटनेच्या दिवशी देखील आरोपी संजय याने 'निराधार योजनेत मिळालेलं मानधान मला का देत नाही', यावरून आपल्या आई वडिलांशी वाद घातला होता. निराधार योजनेत मिळालेल्या तुटपुंज्या पैशात घरखर्च भागवायचा की मुलाला दारूसाठी पैसे द्यायचे, या विवंचनेत असणाऱ्या आई वडिलांनी मुलाला  पैसे देण्यास नकार दिला. यामुळे कुटुंबात मोठा वाद झाला. हेही वाचा-अंघोळ करणाऱ्या महिलेसोबत सुरक्षा रक्षकाचं अश्लील कृत्य, पुण्यातील घटना हा वाद विकोपाला जाऊन आरोपी मुलगा संजय याने बाजेचा ठावा वडिलांच्या डोक्यात घातला. हा घाव इतका जबरी होता की, वडील जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यावेळी आरोपीनं वडिलांसोबत आईला देखील मारहाण केल्याने तीही गंभीर जखमी झाली. वयोवृद्ध दाम्पत्याला पोटच्या लेकांनी मारहाण केल्यानंतर, आसपासच्या लोकांनी तातडीनं दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. पण माधव घंगाळे यांची वाटेतच प्राणज्योत मालवली. तर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात आईवर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Nanded

    पुढील बातम्या