मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

संतापजनक! पत्नी रुसल्याचा आला राग, काठीने मारून केला खून

संतापजनक! पत्नी रुसल्याचा आला राग, काठीने मारून केला खून

पत्नी रुसून गेल्याचा (Husband hits wife with stick to kill her) राग मनात ठेऊन पतीने तिला काठी घेऊन केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

अमेठी, 23 नोव्हेंबर: पत्नी रुसून गेल्याचा (Husband hits wife with stick to kill her) राग मनात ठेऊन पतीने तिला काठी घेऊन केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पती आणि पत्नी यांच्यात अनेकदा भांडणं (Fight between husband and wife) होत असतात. काही भांडणं ही पेल्यातील वादळं ठरतात, तर काही भांडणं ही दीर्घकाळ सुरू राहतात. अनेकदा पत्नी पतीवर रुसून माहेरी निघून जाते. अशाच प्रकारे पत्नी रुसून माहेरी निघून गेल्याचा राग मनात ठेवत एका पतीने तिची (Murder of wife at her house) निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशमधील अमेठी परिसरात राहणाऱ्या पिंकी नावाच्या तरुणीचं सहा वर्षांपूर्वी प्रतापगढ परिसरातील राम मिलन नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली होती. अनेकदा दोघांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून वाद होत असत. नुकत्याच झालेल्या भांडणानंतर पत्नी पिंकी ही सासर सोडून माहेरी राहायला आली होती. आपल्यावर रुसून माहेरी राहायला गेल्याचा पती राम मिलनच्या मनात राग होता. पत्नीला धडा शिकवण्याच्या इराद्याने तो तिच्या माहेरी गेला.

पत्नीला जबर मारहाण

रागाच्या भरात पत्नीच्या माहेरच्या घऱात घुसलेल्या राम मिलनने घरात आरडाओरडा करत पत्नीचा शोध घ्यायला सुरुवात केली. पत्नी दिसताच त्याने जवळची काठी उचलली आणि तिला मारहाण करायला सुरुवात केली. आरडाओरडा करणाऱ्या पिंकीला वाचवण्यासाठी पुढे येईपर्यंत त्याने पिंकीला जबर मारहाण केली होती. तिच्या डोक्यात अनेक वार झाले होते आणि ती रक्तबंबाळ झाली होती.

हे वाचा - परमबीर सिंग 'फरार', जुहूतल्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कोर्टाची ऑर्डर

उपचारादरम्यान मृत्यू

गंभीर जखमी अवस्थेत पिंकीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. त्यानंतर पिंकीच्या गावातील ग्रामस्थांनी आरोपी राम मिलनला पकडून मारहाण करत त्याला पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी पिंकीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

First published:

Tags: Crime, Murder, Uttar pardesh, Wife and husband