• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन; पत्नीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन; पत्नीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Suicide in Karmala: पत्नीनं आणि तिच्या घरच्यांनी छळ (Harassment by Wife and in law family) केल्यामुळे एका तरुणानं आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 • Share this:
  करमाळा, 02 ऑगस्ट: सासरच्या कुटुंबीयांकडून छळ केल्यानं एखाद्या विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पण सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा (karmala) याठिकाणी पत्नीनं आणि तिच्या घरच्यांनी छळ (Harassment by Wife and in law family) केल्यामुळे एका तरुणानं आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला नांदायला न पाठवणे, जमीन नावावर करून देण्यासाठी तगादा लावणे अशा विविध कारणातून मानसिक छळ केल्यानं संबंधित तरुणाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अभिजित कांतीलाल घोगरे असं संबंधित आत्महत्या करणाऱ्या 32 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो करमाळा तालुक्यातील सरपडोह येथील रहिवासी आहे. मृत अभिजित याचा मागील काही दिवसांपासून विविध कारणांसाठी पत्नी आणि सासरच्या मंडळीकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. काही दिवसांपूर्वी मृत अभिजित याची पत्नी कोणतही कारण नसताना, घर सोडून माहेरी गेली. यामुळे अभिजितनं पत्नीला घरी येण्यासाठी अनेकदा विनवणी केली. पण सासरच्या कुटुंबीयांनी पत्नीला पाठवण्यास नकार दिला. हेही वाचा-VIDEO: मुलांसोबत आईचं राक्षसी कृत्य; नग्न करून मारहाण, संतापजनक कारण समोर तसेच, जमीन पत्नीच्या नावावर करून देण्याचा तगादा लावला. यासाठी तरुणावर मानसिक दबाब टाकला जात होता. एवढंच नव्हे तर, आरोपींनी जावयाकडून बांधकाम करून घेतलं आणि त्याचे पैसेही दिले नाहीत. सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या अशा त्रासामुळे अभिजित यानं घरातील लोखंडी नळीला ड्रीपच्या पाईपने गळफास लावून आत्महत्या केली आहे. हेही वाचा-दोन बायकांमुळे नवरा त्रस्त, सासूबाईनं शोधला अजब उपाय अन् गावभर झाला बोभाटा ही घटना उघडकीस येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी नातेवाईक आणि कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर पोलसांनी मृताच्या पत्नीसह सासरच्या चार जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: