मराठी बातम्या /बातम्या /देश /दोन बायकांमुळे नवरा त्रस्त, सासूबाईनं शोधला अजब उपाय अन् गावभर झाला बोभाटा

दोन बायकांमुळे नवरा त्रस्त, सासूबाईनं शोधला अजब उपाय अन् गावभर झाला बोभाटा

एका सामन्य कुटुंबातील मुलानं दोन लग्न (2 Marriages) केल्यास काय होऊ शकतं याचा प्रत्यय नुकताचं एका घटनेमुळे आला आहे.

एका सामन्य कुटुंबातील मुलानं दोन लग्न (2 Marriages) केल्यास काय होऊ शकतं याचा प्रत्यय नुकताचं एका घटनेमुळे आला आहे.

एका सामन्य कुटुंबातील मुलानं दोन लग्न (2 Marriages) केल्यास काय होऊ शकतं याचा प्रत्यय नुकताचं एका घटनेमुळे आला आहे.

रामपूर, 02 ऑगस्ट: एका सामन्य कुटुंबातील मुलानं दोन लग्न (2 Marriages) केल्यास काय होऊ शकतं याचा प्रत्यय नुकताचं एका घटनेमुळे आला आहे. नवऱ्यावरून दोन बायकांमध्ये सतत होणारा वाद थांबण्यासाठी सासूबाईला (Mother in law) आपल्या मुलाच्या दोन बायकांच्या (two wife) मध्ये जाऊन झोपायची वेळ आली आहे. पण सासूच्या या कृत्यामुळे वैतागलेल्या दोन्ही बायकांनी मदतीसाठी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. बायकांची तक्रार ऐकल्यानंतर पोलीसही हैराण झाले आहेत. यानंतर पोलिसांनी पती आणि सासूला पोलीस ठाण्यात बोलवून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तसेच दोन्ही बायकांच्या मध्ये सासूबाईनं टाकलेला खाट बाजूला काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

संबंधित घटना अझीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टांडा या गावातील आहे. येथील युवक फिरासत अली यानं दोन लग्न केली आहेत. ही दोन लग्नच या विचित्र घटनेची मुळ कारण आहे. खरंतर, टांडा येथील रहिवासी असणाऱ्या फिरासत यानं आठ वर्षांपूर्वी गावातील नसरीन नावाच्या तरुणीशी विवाह केला होता. लग्नाच्या चार वर्षानंतर फिरासत याचं गावातील अन्य एक तरुणी शारिकासोबत प्रेमसंबंध जुळले. काही दिवसानंतर फिरासतनं शारिकासोबत न्यायालयात जाऊन विवाह केला.

हेही  वाचा-लव्ह, सेक्स आणि धोका! पुण्यात लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार; HRचा कांड उघड

दरम्यान पहिल्या पत्नीला ही बाब कळल्यानंतर तिने बराच वादंग केला. पण गावकऱ्यांनी त्यांच्यात समजूत घालून प्रकरण मिटवलं. यानंतर दोघी एकत्र नांदू लागल्या. पण कालातरानं या दोघींमध्ये सतत खटके उडू लागले. काही वेळा दोघांनी एकमेकांना मारहाण देखील केली आहे. दोन्ही पत्नीला समजावून सांगण्यासाठी पती भांडणात आल्यानंतर बायकांनी त्यालाही धुतलं आहे. घरातील वाढता वाद लक्षात घेत, सासूबाईंनी दोन्ही पत्नीला नवऱ्याला भेटण्यास मज्जाव केला.

हेही  वाचा-बलात्कार केलेल्या आरोपीसोबत लग्न करायचंय; पीडितेची कोर्टात धाव, मिळालं हे उत्तर

तसेच स्वतःचा खाट दोन्ही  बायकांच्या मध्ये आणून लावला. सासूबाईच्या या कृत्यामुळे काही दिवसातच दोन्ही बायका वैतागल्या. शेवटचा पर्याय म्हणून दोघींनी अझीमगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याठिकाणी पोलिसांनी सर्वांना एकत्र बसवून त्यांची समजूत घातली आहे. तसेच गावच्या पंचायतीनं दोन्ही बायकांच्या मध्ये लावलेला सासूबाईचा खाट काढायला लावला आहे. तसेच त्याठिकाणी नवऱ्याचा खाट लावण्यात यावा, असा आदेश दिला आहे. तसेच पतीनं दोन्ही पत्नींना एकसमान हक्क द्यावा, असंही पंचायतीनं सांगितलं आहे. यानंतर हा वाद मिटला आहे.

First published:

Tags: Uttar pardesh