Home /News /viral /

VIDEO: पोटच्या मुलांसोबत आईचं राक्षसी कृत्य; नग्न करून अमानुष मारहाण, संतापजनक कारण आलं समोर

VIDEO: पोटच्या मुलांसोबत आईचं राक्षसी कृत्य; नग्न करून अमानुष मारहाण, संतापजनक कारण आलं समोर

सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. यात एक आई आपल्या मुलांना अमानुष मारहाण करताना दिसते.

    नवी दिल्ली 02 ऑगस्ट : असं म्हणतात की या जगात आई (Mother) ही एकमेव अशी व्यक्ती असते जी आपल्या मुलांवर निस्वार्थीपणे प्रेम करते. मुलांना कोणत्याही दुःखाला सामोरे जावं लागू नये, यासाठी आई आयुष्यभर प्रयत्न करत असते. आपल्या मुलांना थोडं काही झालं तरीही आईला त्रास होतो. मात्र, आजकाल काही महिला हे सर्व खोटं ठरवत आहेत. अनेकदा आईनंच आपल्या मुलांचा जीव घेतल्याच्या बातम्याही पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral) होत असून हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. यात एक आई आपल्या मुलांना अमानुष मारहाण करताना दिसते. ही घटना हरियाणाच्या (Haryana) फरीदाबाद जिल्ह्यातील आहे. पिझ्झा खाताच मुलाच्या तोंडातून येऊ लागलं रक्त अन् मग...; धक्कादायक घटनेनं खळबळ हा व्हिडिओ फरीदाबादच्या सारन येथील असल्याचं समोर आलं आहे. मुलांकडून दूध खाली पडल्यानं या महिलेनं त्यांना अमानुष मारहाण केली (Mother Beaten Children's) आहे. यानंतर महिलेनं आपल्या दोन्ही मुलांचे कपडे काढले आणि त्यांना घराबाहेर काढलं. हा व्हिडिओ मुलांच्या आईनंच बनवला मात्र नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे पोहोचल्यावर प्रकरणाची चौकशी सुरू झाली. मुलांनाही याबाबत विचारणा करण्यात आली. यानंतर महिलेच्याविरोधात सारन येथील ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. महिलेसमोरच कपडे काढून प्रायव्हेट पार्ट दाखवू लागला पोलीस; सांगितलं विचित्र कारण चाइल्ड वेलफेअर कमिटीसोबत जोडलेल्या लोकांचं असं म्हणणं आहे, की या प्रकरणी कोर्ट जे आदेश देईल त्याप्रमाणे मुलांची कस्टडी दिली जाईल. आज तकनं दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे. महिलेनं स्वतःच्या मुलांसोबत केलेलं हे कृत्य पाहून सगळेच हैराण झाले आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Shocking news

    पुढील बातम्या