आष्टी, 07 ऑगस्ट: जालना (Jalna) जिल्ह्यातील आष्टी याठिकाणी एका तरुणानं आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या (Son Murdered Mother) केली आहे. दारूसाठी घरातील धान्य विकणाऱ्या (Sell grain to buy alcohol) तरुणाला आईनं रोखलं होतं. याचाच राग मनात धरून नराधम मुलानं काठीने बदडून (Beat with wooden stick) आईचा जीव घेतला (Mother death) आहे. याप्रकरणी आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रूर मुलाच्या मुसक्या आवळल्या (Accused Son arrest) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दारूची मजा घेण्यासाठी तरुणानं आईची हत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वृंदावनी यदाची शिंदे असं हत्या झालेल्या 55 वर्षीय जन्मदात्या माऊलीचं नाव आहे. मृत वृदांवनी या आपला 68 वर्षीय पती यदाची अंबाजी शिंदे आणि मुलगा सखाराम यांच्या समवेत परतूर तालुक्यातील लोणी येथे वास्तव्याला होत्या. याप्रकरणी पोलिसांनी मद्यपी मुलगा सखाराम शिंदे याला अटक केली आहे. सखारामला दारुचं व्यसन आहे. तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला असून दारूच्या पैशासाठी घरातील साहित्य, भांडी आणि धान्य विकून तो दारूसाठी पैसा मिळवायचा.
हेही वाचा- दारुच्या नशेत घेतला आईचा जीव, व्यसनाला विरोध करणाऱ्या 75 वर्षांच्या आईचा निर्घृण खून
दरम्यान गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास देखील आरोपीनं दारुच्या पैशासाठी घरातील धान्य विक्रीला काढलं होतं. पण घरातील धान्य विकलं तर खायचं काय? असा प्रश्न सतावणाऱ्या माऊलीनं मद्यपी मुलाला धान्य विकण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे मायलेकात साडे अकरा वाजताच वाद झाला. या वादामुळे संतापलेला मद्यपी मुलगा सखाराम यानं आपल्या आईलाच मारहाण करायला सुरुवात केली.
हेही वाचा-प्रायव्हेट पार्ट आधी जळावा म्हणून चितेवर उलटा ठेवला चिमुरडीचा मृतदेह
आरोपी मुलानं आपल्या आईला काठीने पायावर, हातावर आणि डोक्यात जोरदार वार करत नरक यातना दिल्या. पोटच्या लेकानं केलेल्या मारहाणीत वृंदावनी गंभीर जखमी झाल्या. यातचं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्रीची वेळ असल्यानं त्यांच्या मदतीला देखील कोणी येऊ शकलं नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder