मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सोसायटीत दाराची कुणी तरी लावत होतं कडी, जाब विचारला तर शेजाऱ्याने केला चाकूने हल्ला

सोसायटीत दाराची कुणी तरी लावत होतं कडी, जाब विचारला तर शेजाऱ्याने केला चाकूने हल्ला

 सोमवारी पुन्हा जीवन हे रात्री कामावरून घरी आले असता त्यांना आपल्या दाराला बाहेरून कडी लावून घरच्यांना कोंडवल्याचे समजले.

सोमवारी पुन्हा जीवन हे रात्री कामावरून घरी आले असता त्यांना आपल्या दाराला बाहेरून कडी लावून घरच्यांना कोंडवल्याचे समजले.

सोमवारी पुन्हा जीवन हे रात्री कामावरून घरी आले असता त्यांना आपल्या दाराला बाहेरून कडी लावून घरच्यांना कोंडवल्याचे समजले.

अंबरनाथ, 20 ऑक्टोबर : अंबरनाथमध्ये (ambarnath) एका सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबाला दाराची कडी लावून रोज घरात कोंडवलं जात असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराने कंटाळलेल्या घरमालकाने शेजाऱ्याला विचारणा करण्यासाठी गेले असता शेजाऱ्याने त्यांच्यावर चाकू हल्ला (knife attack) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील पठारे पार्क परिसरात ही घटना घडली आहे.  याप्रकरणी हल्लेखोर शेजाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पूर्वेच्या पाठारे पार्क परिसरात साईप्रसाद नावाची इमारत आहे. या इमारतीत जीवन लोखंडे हे त्यांची पत्नी तेजश्विनी आणि दोन मुलींसह राहतात.

जीवन हे कामाला जाताच त्यांच्या घरच्या दरवाजाला अनेक दिवसांपासून कोणीतरी बाहेरून कडी लावून त्यांच्या कुटूंबीयांना दिवसभर घरात कोंडून ठेवत होतं. याचा त्रास जीवन आणि त्यांच्या परिवाराला सहन करावा लागत होता.

मौलानाकडून 6 वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार; वर्ध्यातील खळबळजनक घटना

दरम्यान, सोमवारी पुन्हा जीवन हे रात्री कामावरून घरी आले असता त्यांना आपल्या दाराला बाहेरून कडी लावून घरच्यांना कोंडवल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना विचारपूस केली असता शेजारी राहणारे विनोद नारगोलकर, स्नेहा नारगोलकर आणि स्नेहा यांची आई प्रियांका यांनी घराबाहेर येऊन जीवन यांच्याशी भांडायला सुरुवात केली.

सचिन बन्सल यांनी या स्टॉकमध्ये वाढवली गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

त्यातच विनोद नारगोलकर यांनी जीवन लोखंडे यांच्या जांघेवर चाकूने वार केला. तर प्रियांका आणि स्नेहा यांचीही त्यांच्याशी झटापटी झाली. या घटनेनंतर जीवन लोखंडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रियांका चारी, स्नेहा नारगोलकर आणि विनोद नारगोलकर या तिघांच्या विरोधात आयपीसी ३२४, ३५२, ३२३ आणि 34 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांनाही अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आलं असता न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

दरम्यान, हल्ला करणाऱ्या शेजारीच आम्हाला कडी लावून कोंढवत असल्याचा संशय लोखंडे यांनी व्यक्त केला. तर पोलीस मात्र हा प्रकार कोण करतंय याचा तपास करत आहेत.

First published:
top videos