जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ऊसतोड मजुरांवर काळाचा घाला, ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळलं, 3 महिलांसह 2 मुलांचा मृत्यू

ऊसतोड मजुरांवर काळाचा घाला, ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळलं, 3 महिलांसह 2 मुलांचा मृत्यू

ऊसतोड मजुरांवर काळाचा घाला, ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळलं, 3 महिलांसह 2 मुलांचा मृत्यू

घटनेनंतर पोलिसांनी जखमी मजुरांना‌ करकंब येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

  • -MIN READ Pandharpur,Solapur,Maharashtra
  • Last Updated :

पंढरपूर, 14 डिसेंबर : ऊसतोड मजुरांना उसाच्या फडात घेवून जात असताना ट्रॅक्टरला मोठा अपघात झाला. ट्रॅक्टर उजनी कालव्यात पडल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये 3 ऊसतोड मजूर महिलांसह 2 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 11 वाजेच्या सुमारास पंढरपूर जवळच्या करकंब परिसरात घडली. हे ऊस तोडणी मजूर मध्यप्रदेश येथील आहेत. आज पहाटे ऊसतोड मजूर हे शेतीकडे निघाले होते. शेतातून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर हे उजनी कालव्यात पडले. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. या अपघातामध्ये 3 ऊसतोड मजूर महिलांसह 2 लहान मुलांचा मृत्यू झाला. मुलांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ( बैलगाडीनंतर समृद्धी महामार्गावर धावले हरीण, Video Viral ) घटनेनंतर पोलिसांनी जखमी मजुरांना‌ करकंब येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हे ऊस तोडणी मजूर मध्यप्रदेश येथील आहेत. मृतांची नावे समजू शकली नाहीत. जखमी शेत मजुरांवर उपचार सुरू आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय ट्रक आणि कारचा भीषण अपघात दरम्यान, बीड जिल्ह्यात सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंबा घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. रात्री साडेनऊ वाजता मालवाहू ट्रक आणि स्विफ्ट डिझायरची धडक होऊन झालेल्या अपघातात एका महिलेसह दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ( पतीने पत्नीच्या नाकाला घेतला चावा तर सासऱ्याने काठीने मारले, बीडची भयंकर घटना ) जखमींवर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत श्रीरामपूर येथील वसीम मुलाहीज नजीर (वय 35 वर्षे), मुख्तार शेख (वय 30) आणि एक महिला हे स्विफ्ट डिझायरने मांजरसुंब्याहून बीडकडे येत होते. तर मालवाहू ट्रक ही देखील मांजरसुंब्याहून बीडकडे येत होती. रात्री साडेनऊ वाजता स्विफ्ट कार ट्रकला पाठीमागून धडकली. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी व पोलिसांनी उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात पाठवले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात