बीड, 14 डिसेंबर : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीच्या नाकाला चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकरा घडला आहे. बीड जिल्ह्यातील उत्तरेश्वर पिंपीमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एव्हढेच नव्हे तर या महिलेला तिच्या सासू-सासऱ्यांनी देखील मारहाण केलीये. काठीने आणि दगडाने या महिलेला मारहाण करण्यात आली असून, मारहाणीत महिला जखमी झाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीचा नाकाला चावा घटनेबाबत अधिक माहिती अशी की, उत्तरेश्वर पिंपरी येथील पूनम अशोक शिंदे (25) या महिलेला दोन मुले, एक मुलगी अशी तीन आपत्य आहेत. पूनम शिंदे या त्यांच्या शेजारी राहत असलेल्या एका व्यक्तीला बोलत होत्या. यावरून त्यांच्या पतीने पूनम यांच्या चारित्र्यावर सशय घेतला. त्यानंतर थांब तुझे नाकच कापतो म्हणत पती अशोक शिंदे याने त्यांच्या नाकाला चावा घेतला. या घटनेत पूनम शिंदे या जखमी झाल्या. हेही वाचा : श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल; आंतरधर्मीय विवाहाबाबत मोठा निर्णय सासू,सासऱ्याकडून मारहाण त्यानंतर पुनम शिंदे यांना त्यांच्या सासऱ्याने वेळूच्या काठीने आणि दगडाने मारहाण केली. तसेच सासुने त्यांचे केस धरून त्यांना मारहाण केली. जखमी पुनम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पूनम शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती अशोक शिंदे, सासरा उद्धव शिंदे, सासू सुनीता शिंदे या तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.