नागपूर, 14 डिसेंबर : भारताच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समृद्धी महामार्ग गेम चेंजर ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे तोंडभर कौतुक केले. मात्र, उद्घाटन होऊन काही तासच उलटून गेल्यावर समृद्धी महामार्गावर चालणाऱ्या बैल गाड्यांच्या ताफ्याने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले. हे चित्र ताजे असतानाच, याच महामार्गावर दोन हरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा सोशल मीडियावर हा समृद्धी महामार्ग चर्चेचा विषय ठरला आहे. नागपुरला मुंबईशी जोडणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरलेला महामार्ग म्हणजे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग होय. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. नागपुरातील जामठा ते मुंबईतील भिवंडीपर्यंत संभाव्य 8 तासात प्रवास पूर्ण करू शकणारा हा महामार्ग बनला आहे. भारतातील सर्वात जास्त म्हणजे तब्बल 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. महाराष्ट्राच्या 10 जिल्ह्यांना हा मार्ग जोडला गेला आहे. FIFA World Cup: फुटबॉलचा 200 वर्ष जुना खजिना नागपुरात! पाहा Video व्हिडिओ व्हायरल महामार्गावर अनेक बैल गाड्यांवर सामान लादून एका गावावरून दुसऱ्या गावी जाणाऱ्या बैलगाडी तांड्याचा फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. केवळ चारचाकी वाहनांनाच प्रवेश असलेल्या या महामार्गावर या बैलगाड्या कशा आल्या, असा सवाल देखील त्या निमित्याने उपस्थित करण्यात आला होता. हे चित्र समोरं असतानाच याच समृद्धी महामार्गावरचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये चक्क 2 हरीण पळताना दिसत आहेत. एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कैद केला आहे. प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी व्यवस्था तब्बल 10 जिल्हे 26 तालुके आणि 392 गावांना जोडणाऱ्या या महामार्गावर एकूण 50 उड्डाणपूल व 6 बोगदे आहेत. 300 वाहनांसाठींचे अंडरपास तर 400 पादचारी अंडरपास तयार करण्यात आले आहे. 55 हजार कोटी रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेला हा महामार्ग एक आदर्श महामार्ग असल्याचा बोललं जात आहे. विशेषतः यात वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारं ‘हाई झुमका वाली पोर’ गाणं कसं सुचलं? पाहा Video रस्त्यांच्या दुतर्फा जनावर रस्त्यावर येणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली आहे. असं असतानाही हरणे महामार्गावर आली कशी, हा सवाल पुन्हा एकदा सोशल मीडियावर उपस्थित होत आहे. या हरणांचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.