अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर 23 मार्च : रोज निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना करत शेती करणे हे शेतकऱ्यांपुढील मोठं आव्हान आहे. हे आव्हान पेलायचं असेल तर योग्य नियोजन आणि अभ्यास आवश्यक आहे. सेंद्रीय शेतीचा पर्याय वापरला तर आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील गव्हाची देखील निर्यात होऊ शकते, असं वृत्त आम्ही यापूर्वी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताला दुजोरा देणारी घटना आता समोर आली आहे.
माळशिरस तालुक्यातील दसूर गावातील शेतकरी सुभाष कागदे यांनी एकरी 25 क्विंटल इतकं विक्रमी गव्हाचं उत्पादन घेतलं आहे. कागदे यांच्या शेतात यापूर्वी एकरी 12 ते 15 एकर गव्हाचं उत्पादन निघत होतं. पण, डॉ. सलीम चन्नीवाला यांनी निर्माण केलेल्या जनम चरखा खतामधून त्यांच्या शेतीमधील उत्पादनात वाढ झाली आहे.
कॅन्सरमुळं जवळची माणसं गमावलेल्या शास्त्रज्ञानं शोधलं सेंद्रीय खत,सर्वांचाच होणार फायदा! Video
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा सोलापूर जिल्ह्यातील 104 गावांना फटका बसला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीही या शेतकऱ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागले. पण, कागदे यांनी पावसाचं चिन्ह दिसताच काळजी घेतली. त्यांनी वेळेच्या एक दिवस आगोदरच मशिनचा वापर करत गव्हाचे पिक काढून घेतले.या तत्परतेचा त्यांना फायदा झाला आहे.
Video: सोलापूर जिल्ह्यातील सर्वात फेमस भेळ, एकाच प्लेटमध्ये भरतं पोट!
'जैनम चरखा आणि क्रांती ॲग्रोटेक या सेंद्रिय खताची आम्ही बाजारात विक्री केली. कागदे यांनी आम्ही दिलेले सर्व गाईडलाईन्स फॉलो केल्या. त्याचा त्यांना फायदा झाला असून त्यांना विक्रमी उत्पादन मिळाले. हा सेंद्रीय गहू असल्याची आम्हाला खात्री आहे. आमच्या मार्गदर्शानातून निर्माण झालेल्या प्रॉडक्टचे हे उत्तम उदाहरण आहे,' असं मत जैनम चरखाचे संचालक अनिल कुमार जैन यांनी व्यक्त केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Local18, Organic farming, Solapur, Success story